August 8, 2025

जाधवर,गंभीरे खराटे, राऊत यांना यावर्षीचे पुरस्कार जाहीर

  • राष्ट्रमाता जिजाऊ संस्थेचा उपक्रम
  • कळंब (राजेंद्र बारगुले ) – दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्था सौदणा अंबा या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व महीलांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
    या वर्षीचा राष्ट्रमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार शहरातील महानंदा लक्ष्मणराव जाधवर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक कार्य गौरव पुरस्कार तालुक्यातील हसेगाव (शि) येथील डॉ सरोजिनी संतोष राऊत, बाळशास्त्री जांभेकर पत्रकारिता जिवनगौरव पुरस्कार दिलीपराव गंभीरे व राजर्षि शाहू महाराज शिक्षणरत्न पुरस्कार महादेव खराटे यांना जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव परमेश्वर पालकर यांनी जाहीर केले आहेत. लवकरच या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले
error: Content is protected !!