कळंब (महेश फाटक ) – दिनांक 29 मार्च 2024 रोजी कळंब येथील साई लक्ष करिअर अकॅडमी च्या अभ्यासिकेतील भैरवनाथ अध्यापक विद्यालयातील विद्यार्थी विजय समर्थ सुकते,प्रियंका नंदकुमार पवार व सुरज रमेश काळे या टीईटी पात्र शिक्षक यांची भरती प्रक्रिया मार्च -२०२४ जिल्हा परिषद शिक्षक म्हणून सरळ भरती झाली आहे. त्यानुसार विजय सुकते यांची जि .प. शिक्षक (कोल्हापूर ) प्रियंका पवार जि. प. शिक्षक ( नागपूर) व सुरज काळे यांची जि. प .शिक्षक (रायगड ) येथे नियुक्ती मिळाली आहे.या नियुक्ती बद्दल साई लक्ष करिअर अकॅडमी अभ्यासिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात डी. के. कुलकर्णी (अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष ) यांच्या अध्यक्षेखाली व प्रमुख पाहुणे सुरेश टेकाळे ( मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष),सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक माधवसिंग राजपूत ,साई लक्ष करिअर अकॅडमीचे संचालक हनुमंत पुरी , नंदकुमार पवार यांच्या हस्ते फेटा ,शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला याप्रसंगी डि.के.कुलकर्णी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात गुणवत्ता ,परिश्रम यांच्या बळावर यश संपादन केले आहे.त्याचे कौतुक करून राष्ट्र उभारणीत आपली भूमिका महत्त्वपूर्ण राहणार आहे असे सांगून निवडीबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या तर या निवडीसाठी पालक मार्गदर्शक व साई लक्ष करिअर अकॅडमी चे संचालक शिक्षक हनुमंत पुरी ,शिक्षिका शारदा पुरी यांचे सहकार्य व मार्गदर्शन मोलाचे ठरले असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोहिनी शिंदे – चोंदे यांनी तर सूत्रसंचालन धैर्यशील मडके यांनी केले आभार शारदा पुरी यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी व विद्यार्थिनीची मोठी उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले