धाराशिव (जिमाका) – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे सन 2023-24 या आर्थिक वर्षातील महसूल उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तसेच मार्च अखेर असल्यामुळे नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची शक्यता असल्यामुळे नवीन वाहन नोंदणी व त्या अनुषंगाने कर वसुली करण्यासाठी 29 ते 31 मार्च-2024 दरम्यान असलेल्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन कामकाज सुरु राहणार आहे.या सुट्टीच्या दिवशी कार्यालयीन कामकाजासाठी आवश्यक असलेला अधिकारी व कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आलेला आहे. तरी सर्व वाहन विक्रेते व नागरीकांसाठी 29 ते 31 मार्च या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी कार्यालयात नवीन वाहन नोंदणी व कर वसुलीचे कामकाज सुरु राहणार असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला