August 8, 2025

शिवदास आदमाने यांची साधी भोळी वृत्ती, सफाई कामगार ते लिपिक पदावरून सेवानिवृत्ती..!

  • कळंब ( प्रा.अविनाश घोडके यांजकडून ) – साधी राहणी, सरळ आणि निस्वार्थ सेवाभावी वृत्ती असणारा लातूर जिल्ह्यातील बोरगाव (काळे) येथील शिवदास विश्वनाथ आदमाने हा बेरोजगार तरुण कामाच्या शोधात वयाच्या २० व्या वर्षी १९८४ ला मुंबई गाठतो. दामू नगर कांदिवली येथे तात्याराम तांबारे यांच्या खडी केंद्रावर दगड टाकण्याचे काम करतो. वडिलांची आठरा विश्व दारिद्रयाची असलेली परिस्थितीमुळे शिवदास हे जास्त शिक्षण घेऊ शकत नाही. परिस्थितीवर मात करण्यासाठी आई-वडिलांना आर्थिक हातभार लावण्याचा ध्यास घेतलेल्या या कोवळ्या मनावर मुंबईतील दगदग आणि धावपळीचे जीवन अधिराज्य करू शकले नाही. पाच-सहा महिन्यातच थेट कळंब गाठले.पिंपळगाव (डोळा) आजोळ असल्याने डिकसळ येथील वसंत वाघमारे या मिस्त्रीकडे कामाला लागला. शिवदास यांचा साधा-भोळा असणारा स्वभाव आणि त्यांच्या कामातील जिज्ञासू वृत्तीमुळे वसंत वाघमारे यांनी आपली मुलगी पुष्पा सोबत १९८६ मध्ये लग्न लावून दिले.मिस्त्रीचे अर्थात गवंड्याचे काम शिकत असतानीच १ डिसेंबर १९९२ ला शिवदास यांना भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कळंब शाखेत अर्धवेळ सफाई कामगार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. अर्धवेळ सफाई काम करून पुन्हा गवंड्याचे काम करत-करत संसार वेल सुद्धा फुलत गेली. तीन मुलं त्यांचे पालन-पोषण शिक्षण आणि प्रापंचिक संकटावर मात करत असतानी अर्धवेळ सफाई कामगारावरून पूर्ण वेळ शिपाई म्हणून १ डिसेंबर २०१२ ला कायमस्वरूपी नियुक्ती मिळाली. शिवदासचा असणारा प्रामाणिकपणा,जिद्द,चिकाटी आणि मेहनतीमुळे दोन वर्षातच १९ जून २०१४ रोजी लिपिक पदावर पदोन्नती मिळाली.
    ३१ मार्च २०२४ रोजी सेवानिवृत्त होत असतानी दिनांक २८ मार्च रोजी कळंब शाखेच्या वतीने सेवापूर्ती निरोप समारंभातून शिवदास विश्वनाथ आदमाने यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
    याप्रसंगी शाखा अधिकारी बी.वाय.चोरघडे,असद खान, नितीन लिमकर, युवराज मुरकटे, नानासाहेब इखे,विठ्ठल सावंत, श्रीकांत तिकोणे,दादा ढगे,अनिल हुलसुलकर,एकबाल आत्तार,राहुल आदमाने सह सर्व कर्मचारी वृंद व विमा सल्लागार प्रतिनिधी,सा.साक्षी पावनज्योतचे मुख्य संपादक सुभाष घोडके, निवासी संपादक रामेश्वर खापे आदींची उपस्थिती होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कळंब शाखेचे  कर्तव्यदक्ष लिपिक शिवदास आदमाने यांना सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने सेवानिवृत्तीच्या मंगलमय सदिच्छा .
error: Content is protected !!