लातूर (दिलीप आदमाने ) –
सध्या आपल्या देशामध्ये सर्वात मोठ्या लोकशाहीच्या महोत्सवाची चर्चा सुरू आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे आई-बाबा त्याच्या भवितव्याचा सातत्याने विचार करीत असतात. भारत देशाची सशक्त लोकशाही परंपरेचशी जोडलेली आहे. लोकशाहीने आपल्याला समर्थ नागरिक बनण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. तेव्हा लोकशाहीत मतदानाच्या अधिकाराचा वापर करून आपल्या देशाचे सरकार बनविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आई-बाबाकडे मतदानाचा संकल्प व्यक्त करावा आणि त्यांना मतदानासाठी प्रोत्साहित करावे असे प्रतिपादन महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी नुकतेच केले.
महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील स्वीप उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, लातूर, सामान्य निवडणूक विभागाच्यावतीने तयार केलेले मतदान आई-बाबा संकल्प पत्राचे दि.२२ मार्च २०२४ कोटी वितरण महाविद्यालयामध्ये करण्यात आले यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते यावेळी यावेळी डॉ. बाळासाहेब गोडबोले, डॉ. रत्नाकर बेडगे, डॉ. मनोहर चपळे, डॉ मंतोष स्वामी डॉ. सुजित हंडीबाग, प्रा. किसनाथ कुडके, प्रा. धोंडीबा भुरे, डॉ. राहुल डोंबे, डॉ. अभय धाराशिवे, नामदेव बेंदरगे, विरसेन उटगे, राम पाटील यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना डॉ. संजय गवई म्हणाले की, आपल्या लातूर लोकसभा मतदारसंघांमध्ये ०७ मे २०२४ रोजी मतदान होत आहे तेव्हा या मतदानाच्या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या आई- बाबांना मतदान केंद्रावर नेऊन त्यांना मतदान प्रक्रियेमध्ये सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही ते यावेळी म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रत्नाकर बेडगे यांनी केले तर आभार प्रा. किसनाथ कुडके यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रंगनाथ लांडगे आणि अजय गायकवाड यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि संशोधन केंद्रातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे