August 8, 2025

दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीज साजरी

कळंब (शिवराज पौळ) – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठ गमन बीज दिन कार्यक्रमाचे दक्षिणमुखी हनुमान मंदिर कळंब येथे दिनांक ( २७ मार्च ) आयोजन करण्यात आले. यानिमित्त जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व दक्षिणमुखी हनुमान मंदिर भजनी मंडळाच्या वतीने भजन गायन झाले यानंतर दुपारी १२.०५ गुलाल कार्यक्रम संपन्न झाला उपस्थित भजनी मंडळांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे भजन आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा हे भजन गायन गुलाल व फुले व आरती झाल्यानंतर तानाजी कदम यांच्या वतीने खीर प्रसाद वाटप करण्यात आला यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली अमृताची फळे ! अमृताची वेली! तेच पुढे चाली बिजाची !! जे आपण पेरतो तेच उगवते व तशीच फळे येतात याप्रमाणे समाजात चांगले विचार रुजले पाहिजेत अनिष्ट रूढी परंपरा संपल्या पाहिजेत यासाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून व कीर्तनातून महान विचार दिले आहेत या बीज उत्सव कार्यक्रमात दक्षिणमुखी हनुमान भजनी मंडळातील चत्रभूज (आप्पा) चोंदे ,पांडुरंग माळवदे , आप्पा हाजगुडे ,भास्कर वाघमारे, नागनाथ शेंडगे ,बब्रुवान कोळपे ,रामदास जाधव, नागनाथ माळी ,बबनराव वाघमारे, विलास मिटकरी ,पांडुरंग गुरव ,साहेबराव लोंढे, प्रयागा बाई घुले ,मैनाबाई माळी, जान्हवी पत्की, रेखा कुलकर्णी, सविता गुरव, नंदाबाई पांचाळ यांचा सहभाग होता.

error: Content is protected !!