August 9, 2025

आमीन अली समीर अली सय्यद ने केला रमजान चा रोजा (उपवास) पुर्ण

  • कळंब (माधवसिंग राजपूत ) – सध्या मुस्लिम धर्मियांचा पवित्र रमजान महिना सुरु आहे. या महिन्यात महिनाभर उपवास धरत अल्लाहची इबादत करत असतात. इस्लाममध्ये कलमा, नमाज, रोजा, जकात, हज हे पाच प्रमुख तत्व आहे. यात सात वर्षांनंतर रोजा ठेवणे बंधनकारक आहे. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात रोजे (उपवास) करतात..
  • कळंब बाबा नगर येथील सहा वर्षीय आमीन अली समीर अली सय्यद याने आपल्याला देखील रोजा धरावयाचा आहे, असा हट्ट आपल्या आई-वडिलांकडे केला. यंदाचा रमजान महिना कडक उन्हाळ्यात आला आहे, म्हणून आई-वडील त्याला नकार देऊ लागले.मात्र आमीन काही ऐकेना आणि आमीनच्या जिद्दीपुढे आई-वडिलांनी हार मानत रोजा करण्याची परवानगी दिली तर आमीनने देखील पुर्ण दिवसभर काहीही न खाता-पिता नमाजसह रोजा पूर्ण केला.
  • आमीन चा पहिला रोजा पूर्ण झाल्याने तीचे आई, वडिल,मुस्लिम बांधवाकडून, मौलाना, धर्मगुरु, नातेवाईकांकडुन अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
error: Content is protected !!