संभाजीनगर (राजेंद्र बारगुले ) – माथाडी कायद्याचे चौकटीतील सर्व प्रलंबित प्रश्न एका महीन्यात मार्गी लावले जातील असे लेखी आश्वासन, माथाडी मंडळाचे अध्यक्ष व कामगार उपायुक्त चंद्रकांत राऊत यांनी दिल्या. नंतर माथाडी कामगारांचे गेले ५२ दिवस सुरू असलेले ठिय्या आंदोलन आज तूर्त स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी माथाडी मंडळाची असून, ती पूर्ण केली जाईल आणि सर्व प्रलंबित प्रश्न येत्या महिन्याभरात मार्गी लावले जातील असे लेखी पत्र मा.राऊत यांनी , उपोषण मंडपात येवून उपोषणार्थी यांचे कडे सोपविले.यावेळी महारष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे, मराठवाडा लेबर युनियन चे उपाध्यक्ष साथी छगन गवळी, साथी प्रविण सरकटे, साथी देविदास कीर्तिशाही, साथी जगन भोजने, साथी सर्जेराव जाधव इ. प्रमुख उपस्थिती होती. प्रलंबित प्रश्नात माथाडी कामगारांची निश्चीत काल मर्यादेत पडताळणी करणे, बेकायदेशीर रित्या कामावरून कमी केलेल्या माथाडी कामगारांना पूर्ववत कामावर घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याकडे बैठका लावणे, ५ तारखेच्या आत माथाडी मंडळात पगार न भरणाऱ्या, मालक – आस्थापना – कंत्राटदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करणे, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मालक – कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई करणे , थकबाकीची प्रकरण कायद्याप्रमाणे मार्गी लावणे इ. चा सामावेश आहे. माथाडी मंडळाचे अध्यक्ष व कामगार उपायुक्त राऊत व त्यांचे सहकाऱ्यांनी उपोषणाचे मंडपात येवून, प्रश्न मार्गी लावण्याबाबत लेखी आश्वासन दिले त्याबद्दल, त्यांचे संघटनेच्या वतीने अभिनंदन केले, पण दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुन्हा अधिक तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे यांनी दिला.शेवटी राऊत यांचे हस्ते उपोषण करणाऱ्या माथाडी कामगारांचे लिंबू शरबत देवून सर्वांचे उपोषण सोडण्यात आले.
More Stories
ऊसतोडणी कामगार महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य मित्र उपक्रम- रुपाली चाकणकर
सस्ती अदालत उपक्रमातून 560 शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे
हमाल कष्टकऱ्यांच्या बाईक रॅली ने केले शहरात जनजागरण