August 8, 2025

स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्रशासनाचा तुघलकी कारभार

  • कळंब (महेश फाटक) – शहरातील पंचायत समितीच्या तालुका गट शिक्षण अधिकारी कार्यालयात दि.२६ ते २८ मार्च २०२४ ह्या तीन दिवशीय शिक्षक क्षमता दृढीकरण प्रशिक्षण दोन सत्रात चालू आहे. सकाळचे सत्र हे १० ते १ तर दुपारचे सत्र हे २ ते ५ असे आहे. तसेच आता पर्यंत शालेय गट मधील सर्व शिक्षकांचे प्रशिक्षण झाले असून त्यामध्ये दुपारच्या वेळेस भोजन देण्यात आले होते पण सध्या चालू असलेल्या प्रशिक्षणात कनिष्ट महाविद्यालयाचे शिक्षक हे प्रशिक्षण घेत आहेत पण यांना दुपारचे भोजन देण्यात येत नाही तसेच सध्या उन्हाची तीव्रता ही वाढत जात असताना दिसत आहे आणि गट शिक्षण अधिकारी कार्यालयातील सभागृहात असलेले काही फॅन मात्र बंद आहेत.त्यामुळे प्रशिक्षणार्थींना उष्णतेचा त्रास सहन करावा लागत आहे.
    स्थानिक स्वराज्य संस्थांचा कार्यकाल संपूनही शासनाच्या असंविधानिक कारभारामुळे निवडणूका लागत नाहीत आणि निवडणूका नसल्यामुळे प्रशासनावर लोकप्रतिनिधींचे नियंत्रण नसल्यामुळे प्रशासनाचा तुघलकी कारभार चालू आहे.
error: Content is protected !!