August 8, 2025

जिल्हा क्षयरोग केंद्रात विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून साजरा

  • धाराशिव (परमेश्वर खडबडे) – जागतिक क्षयरोग दिन दि.२४ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास यांच्या मार्गदर्शनात जिल्हा क्षयरोग केंद्र धाराशिव येथे विविध कार्यक्रमाच्या आयोजनातून साजरा करण्यात आला.
  • सर्वप्रथम निक्षय मित्र शेख साबेरोद्दिन जियाओद्दिन व टिबी चॅम्पियन नंदकुमार खानवटे यांच्या हस्ते फित कापून रॉबर्ट कॉक यांच्या प्रतीमेस हार अर्पण करून दीप प्रज्वलनाने शुभारंभ करण्यात आला.
  • यावेळी क्षयरोगाविषयी प्रतिज्ञा घेण्यात आली.जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.इस्माईल मुल्ला,माता बालसंगोपन अधिकारी डॉ.कुलदीप मिटकरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.रफिक अन्सारी,वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत ऐवाळे व जिल्हा क्षयरोग कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
  • जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय धाराशिव येथे खाजगी वैद्यकीय व्यावसायीक (निमा) यांची जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली.रांगोळी स्पर्धा घेऊन शासकीय आयुर्वेदिक कॉलेजचे अधिष्ठाता डॉ.गंगासागरे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिदास यांनी विजेत्या विद्यार्थ्याना प्रमाणपत्र व बक्षीस वितरण केले.
  • आज नवीन पाच निक्षय मित्र तयार करून फूड बास्केट वाटप करण्यात आले.नवीन निक्षय मित्राचा व टिबी चॅम्पियनचा सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी आपले मनोगतही व्यक्त केले.
  • प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.मुल्ला यांनी नियमित औषध उपचार घेवून एमडीआर क्षयरुग्णाचे प्रमाण कमी करता येईल याविषयी माहिती दिली.माता बालसंगोपन अधिकारी डॉ.मिटकरी क्षयरोगाविषयी माहिती देऊन Adult BCG vaccination याविषयी मार्गदर्शन केले.
  • जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अन्सारी म्हणाले की, सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक यांनी क्षयरोगाच्या जिवाणूचा शोध लावला. त्यांच्या स्मृतिनिमित्त २४ मार्च हा जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो.जिल्ह्यात जास्तीत जास्त संशयित रूग्णांचा शोध घेऊन त्याचे निदान करुन उपचार करण्यात येत आहे.राज्यस्तरावरून जिल्ह्याला दिलेल्या उद्दिष्टापेक्षा प्रति लाख दोन हजाराच्या पुढे संशयित रूग्ण शोधून निदान झालेल्या रूग्णांवर उपचार सुरू केलेले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात २६ केंद्रामार्फत क्षयरोगाचे निदान केले जात आहे.जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत असल्याचे सांगितले.
  • क्षयरोग दुरिकरणाच्या या लढ्यात समाजातील दानशूर व्यक्तींनी निक्षय मित्र म्हणून उपचाराखालील क्षय रुग्णांना दरमहा अतिरिक्त पोषण आहार देऊन मदत करण्यासाठी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केले.
error: Content is protected !!