(समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे २२ मार्च २०२४ आंबेटेंभे मुरबाड) *राज्य शासनाने “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण”,पुरस्कार देऊन गौरवण्यात आल्यानंतर आज ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मौ. आंबेटेंभे येथील मानवमुक्तीचे प्रणेते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजोळी अर्थात मातोश्री भीमाईच्या माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. दुर्गम जंगली भागातील आंभेटेंभे गाव विकासापासून कोसो मैल दूर, वाट काढत स्फूर्तीस्थळावर पोचलो. “दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती.!” मेणबत्ती प्रज्वलित करून पुष्पहार स्फूर्तीस्थळाला घालून अभिवादन करताना अख्खा संघर्षमय जीवनपट डोळयासमोर उभा ठाकला.”भीमाई भूमी सामाजिक संस्था” “अध्यक्ष भाऊसाहेब रातांबे” दादांनी कफल्लक फकिराचा, सहारा महिला मंडळाच्या अध्यक्षा सहचारिणी सौ. शर्मिला तात्यासाहेब सोनवणे व मा.सरपंच ग्रुप ग्रामपंचायत चामटोली रमेशशेठ जगताप यांचा शिष्टाचार शाल पुष्पगुच्छ देऊन केला. विदर्भातील वाशिमहून आलेल्या मनवर बाईंचाही चहापानासहीत शब्दसुमनानें आदर केला.माता भीमाईची पाचवी पिढी आयु. अशोकदादा पंडित व आयु. सौ.उषाताई अशोक पंडित यांना आम्ही शाल,मिठाई देवून नम्रपणे जयभीम केला.भीमाई माता यांच्या वास्तव्यानं पावन झालेलं घर पाहिले.खंत वाटली.आज साध्या पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्यांची माऊली दगावली की,अलिशान स्मारक उभं रहाते.समोरची जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ब-यापैकी दिसली. येथे केवढी अनास्था.? आमच्या समाजबांधवानी यथाशक्ती रेती, वीटा, सिमेंट यथाशक्ती समर्पित भावनेने दिली तरी राजभवन नको, “भीमालय”, नक्की उभं राहील. समाजभूषण ,पत्रकार, साहित्यिक या नात्याने संवेदनशील भावनेने आयु. रातांबे दादांकडून माहिती घेतली. इस. सन. १९५४ नंतर अनेकांनी सतत पाठपुरावा केला. पण शासनदरबारी उदासिनता, राजकीय नेत्यांनी,लोकप्रतिनिधींनी मनावी अशी जबाबदारी घेतली नाही. आम्ही लढाई लढत राहिलो.जनमताच्या रेट्यामुळे तत्कालीन समाजकल्याण मंत्री ना. चंद्रकांत हंडोरे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी लक्ष दिले. परंतु पुरातत्व विभाग जसा काम करतो तसाच वेळकाढूपणा सुरू होता.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड जाती ज्ञातीं बांधवांच्या सहकार्याने १६ वर्ष लढा दिल्यानंतर आता मूर्त स्वरूप ख-या अर्थाने येत असून, तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री ना. राजकुमार बडोले व राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी साडेचार कोटी रुपये निधी उपलब्ध करून जिल्हा परिषद ठाणे यांच्याकडे वर्ग केला.तरीही सतत पाठपुरावा सुरू आहे. मा. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रयत्नातून स्फूर्तीस्थळाला जाण्यासाठी रस्त्याच्या कामाला गती मिळाली.भीम अनुयायी यांची जनभावना आशी आहे की, ज्या ठिकाणी भीमाईचा जन्म झाला त्याच ठिकाणी राष्ट्रीय स्मारक किमान दोन तीन मजली व्हावं, वरती महामानवाची माता “भीमाई स्फूर्तीस्थळ” व खाली ग्रंथालय, अभ्यासिका केंद्र व दुर्मीळ चित्रांच्या माध्यमातून प्रेरणास्थान उभं राहावं.आज पिण्याच्या पाण्याची समस्या आहे.येथे आज मितीला बोअरवेलची नितांत गरज आहे.१६ ऑक्टोबर २०१८ रोजी केंद्रीय मंत्री ना.रामदास आठवले,खा.कपिल पाटील व दै.वृत्तरत्न सम्राट संपादक बबन कांबळे यांच्या हस्ते भीमाई भूमी जेतवन मौ. आंबेटेंभे येथे सामाजिक सभागृहाचे उद्घाटन झाले. बेचाळीस कोटी रुपयांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प धीम्या गतीने सुरू आहे. लोकप्रतीनिधींनी लक्ष द्यावे.सर्व काही जाणून घेतले.आम्हीही पाठपुरावा करू, वैचारिक मनोमिलन झाले.म्हसा मार्गे मुरबाड गाठले. सोबत आयु. रातांबे दादाही होते.मुरबाडमध्ये आंबेडकरी चळवळीचा समृद्ध वारसा गेली अडीच दशकं एकहाती चालवणारे सच्चे सहपथिक डॅशिंग शिलेदार “अण्णासाहेब साळवे यांची भेट घेतली.शासकीय विश्रामगृह लोकसभा निवडणुक आचारसंहिता सबब म्हणून बंद होते. समोरच निसर्ग हाॅटेलमध्ये अण्णांसाहेबांनी पाहुणचार केला. क्रांतीची बीजे अधिक घट्ट व्हावीत. ऋणानुबंध वृध्दींगत व्हावेत म्हणून आम्ही लढवय्या संघर्षयोध्दा “अण्णांना” हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील” प्रवेशद्वारासमोर शाल, व पुष्प देवून सन्मानित केलं.! आम्हाला समाजभूषण तात्यासाहेब सदाशिव सोनवणे म्हणून शासनदरबारी ओळख मिळाली ती प्रेरणास्थान ” भीमाई”, सुभेदार रामजी बाबा,व प्रेरक मूकनायक, क्रांतिसूर्य, संविधानाचे शिल्पकार “भारतरत्न भीमराव तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर”, यांच्यामुळेच.! “ही तुझीच कमाई आहे गं भीमाई..येथे कोणाचेही काही कष्ट नाही.!” जयभीम!.जय संविधान.!!
@ समाजभूषण तात्यासाहेब सोनवणे तथा सोशल मीडिया ठाणे जिल्हा + ९३२४३६६७०९
More Stories
उल्हास नदी बचाव समितीच्या आंदोलनाला यश;अनधिकृत भराव प्रकरणात दहा कोटीचा दंड
प्रेरणा फाउंडेशनचा मोफत आरोग्य शिबीर व सामाजिक पुरस्कार वितरण सोहळा धुमधडाक्यात साजरा
जिंदादिली का दुसरा नाम, जालिंदर सावंत साहेब!