लातूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – चाकूर तालुक्यातील गांजूर या गावात दि.७ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती मोठया उत्स्फूर्तपणे साजरी करीत असताना येथील आंबेडकरी समाजातील पुरुष, महिला, वयोवृद्ध मंडळी व लहान मुले व मुली यांना गावातील २०० हुन अधिक मनुवादी विचारसरणींच्या समाजकंटकांनी त्यांच्या वर हल्ला करून निळा ध्वज काढून फेकून देवून जयंतीत सहभागी महिलांची विनयभंग केला आहे. त्यामुळे शासनाने या प्रकरणातील सामाजिक कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे मागे घेवून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करावे अशी मागणी असलेले निवेदन दि.२२ मार्च २०२४ रोजी जिल्हाधिकारी,पोलीस अधिक्षक व समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यांना दिले आहे. या निवेदनात भीम आर्मी भारत एकता मिशनचे मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे,महाराष्ट्र संघटक अक्षय धावारे,लातूर शहराध्यक्ष संदीप कांबळे,बाबा ढगे आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
More Stories
समाजसेवेचा गौरव;सुधाकर रणदिवे यांना लातुरात ‘नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार’
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव