August 8, 2025

माथाडी कामगारांचे प्रश्नासाठी सूरु असलेले डॉ.बाबा आढाव व साथी सुभाष लोमटे यांचे बेमुदत उपोषण समाप्त

  • संभाजी नगर – माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी आणि कायद्याची होणारी मोडतोड तात्काळ थांबवावी म्हणून गेले चार दिवसापासून, डॉ.बाबा आढाव व साथी सुभाष लोमटे यांचे सूरु असलेले बेमुदत उपोषण आज समाप्त झाल्याची घोषणा करण्यात आली.
    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उपस्थितीत झालेल्या कामगार संघटना प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय झाला.
    माथाडी धंद्यातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी, शासकीय अधिकारी व कामगार प्रतीनिधिंचे संयुक्त समिति ने ३ महीन्यात उपाय योजना सुचवाव्यात असा निर्णय घेण्यात आला. शिष्टमंडळात मुंबई माथाडी कामगारांचे नेते आ.नरेंद्र पाटील, भगवंतराव पवार,अविनाश रामिष्टे,गुलाबराव जगताप, पोपटराव देशमुख व साथी सुभाष लोमटे यांचा समावेश होता.
    मुख्यमंत्र्यांचे पत्र घेवून बांधकाम मंत्री दादा भूसे हे आंदोलनस्थळी आले व त्यांनी डॉ.बाबा आढाव व साथी सुभाष लोमटे यांचे फळाचा रस देवून बेमुदत उपोषण सोडले.
    यावेळी ना.दादा भुसे सह नरेंद्र पाटील, बळवंतराव पवार, गुलाबराव जगताप, संतोष नांगरे, उल्का महाजन, चंदन कुमार, साथी सुभाष लोमटे यांची भाषण झाली.
    यावेळी अध्यक्षीय समारोप करतांना डॉ. बाबा आढाव यांनी , फक्त माथाडी च नव्हे तर सर्व असंघटित कष्टकऱ्यांची एकजूट करण्यासाठी माथाडी कामगारांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.
error: Content is protected !!