August 8, 2025

कळंब उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, शंभर खाटांची मान्यता

  • कळंब – येथील उपजिल्हा रुग्णालय हे साठ खाटांचे होते. त्याचे श्रेणी वर्धन करुन शंभर खाटांची मान्यता द्यावी ही खूप जूनी मागणी होती.प्रशासन पातळीवर तसा प्रस्ताव ही गेला होता.
    त्याअनुषंगाने दि.०९ जानेवारी २०२४ रोजी प्रसुतीगृहाच्या भूमीपूजनाला आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत आले तेव्हा त्यांच्या निदर्शनास सदर बाब आणून दिली. तेव्हाच मा.मंत्री महोदय यांनी सदर मान्यता त्वरित देण्याची ग्वाही दिली होती. प्रशासनीक प्रक्रिया पुर्ण होताच काल दिनांक 28 फेब्रुवारी रोजी मान्यता प्रदान करणारे पत्र अव्वर सचिव निलम संगवई यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आले.
  • या कामात डॉ.धर्माधिकारी, डॉ.पुरुषोत्तम पाटील व शिवसेनेचे संजय मुंदडा, अँड.मंदार मुळीक, अनंत वाघमारे, सुधीर भवर, सागर मुंडे, शंकर वाघमारे आदींनी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला. व जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी मान्यता दिली.
    यासाठी संजय मुंदडा,सुधीर भवर, मंदार मुळीक, शंकर वाघमारे, शकील काझी, सिध्दू शिंगणापूरे, भास्कर पारेकर, संघर्ष कांबळे आदी शिवसेना कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन डॉ.धर्माधिकारी,
  • डॉ.पुरुषोत्तम पाटील, डॉ.रामकृष्ण लोंढे यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या तसेच पुढील अंमलबजावणी साठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
    शंभर खाटांची मान्यता मिळाल्यामुळे आपोआपच त्यासोबत सोनोग्राफी युनीट, नवीन वाढीव तज्ञांचा ताफा येणार असल्याने कळंब व परिसरातील रुग्णांना मोठी सुविधा प्राप्त होईल.
error: Content is protected !!