August 8, 2025

EVM हटाव,देश बचावसाठी भिम आर्मी भारत एकता मिशनचे उपोषण

  • सोलापूर (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला मतदानाचा अधिकार ईव्हीएमच्या माध्यमातून संपुष्टात आणला जात असून ईव्हीएममुळे लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही कडे वाटचाल होत आहे.ईव्हीएम बंद करून लोकशाही वाचण्यात यावी यासाठी सोलापूर येथील भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष अजय महेंद्रगीकर गेल्या सात दिवसापासून ईव्हीएम विरोधात सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषण करत आहे,त्यांचे प्रकृती खालावत चालली आहे,तरी अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांच्या उपोषणाची दखल घेतली गेलेली नाही. उपोषणाच्या सातव्या दिवशी भिम आर्मी मराठवाडा अध्यक्ष विनोद कोल्हे यांनी अजयची भेट घेऊन तब्येतीची विचारना केली, अजय यांची चालण्याची बोलण्याची ही क्षमता राहिलेली नाही, सोलापूर जिल्हा प्रशासनाने लवकरात लवकर त्यांच्या उपोषणाची दखल घ्यावी
    अजय यांची जर तब्येत ढासाळली गेली तर, सोलापूर जिल्ह्यात भीम आर्मीच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा विनोद कोल्हे यांनी दिला आहे.
error: Content is protected !!