February 7, 2026

अनुसूचित जाती-जमातींच्या हक्क अधिकारांसाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा

  • सोलापूर (शैलेश वेदपाठक) – अनुसूचित जाती-जमातींच्या हक्क अधिकारांसाठी वंचित बहुजन आघाडी सोलापूर-धाराशिव-माढा विभागाच्या वतीने दि.२३ जून २०२५ रोजी सोलापूर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले.या मोर्चास वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चार पुतळा पार्क चौक ते पुनम गेट जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत मार्गक्रमण करण्यात आले.
    मोर्चास दुपारी १ वाजता प्रारंभ झाला.प्रारंभी सुजात आंबेडकर यांनी चार पुतळे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चास सुरुवात केली.या मोर्चात सोलापूर, धाराशिव,माढा विभागासह परिसरातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते,पदाधिकारी, महिला,भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
    मोर्चा घोषणा व मागण्यांचे फलक घेऊन पुनम गेट जिल्हा परिषद कार्यालयासमोर पोहोचला.या वेळी सुजात आंबेडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, “ईव्हीएम मशीनद्वारे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तब्बल ७६ लाख मतं कोठून आली याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. तसेच अनुसूचित जाती-जमातींच्या निधीचा अन्यत्र वापर होऊ नये म्हणून कायदा करावा व या संदर्भात श्वेतपत्रिका काढावी” अशा प्रमुख मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून मांडण्यात आल्या.
    “राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक आयोगास या संदर्भात पत्र लिहून खुलासा मागितला आहे, मात्र निवडणूक आयोग माहिती व डेटा देण्यास टाळाटाळ करत आहे. म्हणूनच आम्ही रस्त्यावर उतरून जनतेला जागृत करण्याचा निर्णय घेतला आहे” असे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.
    ते पुढे म्हणाले, “भाजप म्हणजे नागनाथ आहे तर काँग्रेस सापनाथ आहे.हे मुद्दे विरोधकांनीच जनतेसमोर आणायला पाहिजे होते.मात्र काँग्रेस,शिवसेना व राष्ट्रवादी या विषयावर गप्प बसून आहेत.त्यामुळेच या सत्ताधारी व विरोधकांच्या संगनमताचा पर्दाफाश करण्यासाठी वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर लढा लढेल” असा इशारा त्यांनी दिला.
    कार्यक्रमास राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.नितीन ढेपे,राज्य उपाध्यक्ष प्रा.सोमनाथ साळुंखे, राज्य प्रवक्ता ॲड.अरुण जाधव, युवा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अमोल लांडगे,सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, धाराशिव जिल्हा सरचिटणीस बाबासाहेब जानराव,माढा विभाग जिल्हाध्यक्ष राहुल चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
    तसेच धाराशिव जिल्ह्यातून धनंजय सोनटक्के,शीतल चव्हाण, विद्यानंद वाघमारे,आर.एस. गायकवाड,अंकुश लोखंडे, रवीकिरण बनसोडे,बाबा वाघमारे, अनिल हजारे,कुणाल मस्के, तानाजी बनसोडे,राम गायकवाड, किरण बनसोडे, मुकुंद लगडे, जीवन कदम, किरण गायकवाड, दादासाहेब बनसोडे, मोहन दादा बनसोडे, विनायक दुपारगुडे, रसूल शेख, रघुनाथ गायकवाड, बाबासाहेब गरबडवे, भालेराव, धम्मपाल रणसुरे, तसेच सोलापूर शहर, सोलापूर जिल्हा व माढा विभागातील कार्यकर्ते, पदाधिकारी व समता सैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
error: Content is protected !!