लातूर (दिलीप आदमाने ) – महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन च्या वतीने नेताजी सुभाष चंद्र बोस जीवनगौरव पुरस्कार – २०२४ चे वितरण दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी पत्रकार भवन येथे दुपारी ३.०० वाजता अनिसखान पठाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. जी.प.चे उपमुख्याधिकारी दत्तात्रय गिरी,मुस्लिम विकास परिषदेचे प्रवक्ते साहेब अली सौदागर,डॉ.वर्धमान उदगीरकर, श्रीराम घुले,संपादक सुभाष द. घोडके,महादेव महाराज आडसूळ, स्किल अकॅडमीचे सुरज मांदळे,सुफी संत सय्यद शमशोद्दीन, सिद्धार्थ कवठेकर, अमजद मणियार,उषाताई धावारे, गंगासागर ढवळे आदि मान्यवरांच्या हस्ते सौ.शालिनी कोकाटे,सौ.सुरेखा पाटील, सहारा शेख,इंजि.अनंत व्यास,अशोक साबळे,सुभेदार विश्वनाथ जाधव,प्रा.आनंद मोहळकर,इंजि.सतीश जोशी,उत्तरेश्वर मुठाळ,इंजि. मनोज जोशी,बंडू आबा ताटे, ब्रह्मानंद नारागुडे,डॉ.प्रभाकर स्वामी,विक्रांत हावळे ,शेख मतीन चाँदसाब,बाबासाहेब मडके आदींना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशनचे सुफी संत सय्यद शमशोद्दीन यांनी तर सूत्रसंचालन अंकिता माकणे व आभार सूरज मांदळे यांनी मानले.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे