कळंब – स्वयमं शिक्षण प्रयोग संस्था अंतर्गत युरोपियन युनियनच्या सहकार्यातुन कळंब तालुक्यातील महिलांना दि.24 फेब्रुवारी 2024 रोजी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कळंब तालुक्यातील महिलांना 1 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत लिडरशिप, शेतीपूरक व्यवसाय, स्त्री -पुरुष समानता, पॅकेजिंग ब्रॅण्डिंग, डिजीटल प्रशिक्षण असे वेगवेगळे विषय घेऊन प्रशिक्षण देण्यात आले. विकास गोफणे यांनी बिझनेस प्लॅन कसा तयार करावा या विषयी मार्गदर्शन केले.तसेच महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिले.रुपेश उमरदंड यांनी शेतीपूरक व्यवसाय या विषयी सखोल मार्गदर्शन केले.शेतमालावर प्रक्रिया उद्योग उभा करुन आपण जास्तीत जास्त नफा कमवु शकतो या विषयी मार्गदर्शन केले,दिपा जाधव यांनी लिडरशिप व डिजिटल या विषयी मार्गदर्शन केले,महिलांना मोबाईलचा वापर आपल्या व्यवसायासाठी कसा करायचा या विषयी माहिती दिली.फोन पे, गुगल पे, ओके क्रेडिट, मेरा बिल, बॅक आकाऊंट विषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणासाठी कळंब तालुक्यातील महिलांनी सहभागी होऊन आपला प्रतिसाद नोंदवला. प्रशिक्षणासाठी स्वयमं शिक्षण प्रयोग संस्थेचे प्रोजेक्ट् मॅनेजर किरन माने यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.महिलांना व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन दिले. डिस्ट्रिक काॅर्डिनेटर सिमा सय्यद यानी महिलांना स्त्री -पुरुष समानता विषयी मार्गदर्शन केले तालुका समन्वयक रंजना कदम यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.तसेच महिलांना शासकिय योजनांची माहिती दिली.बॅक लोन विषयी माहिती दिली. यावेळी स्वयमं शिक्षण प्रयोग संस्थेचे प्रोजेक्ट् मॅनेजर किरन माने, जिल्हा काॅर्डिनेटर सिमा सय्यद, तालुका काॅर्डिनेटर रंजना कदम.लिडर दिपाली जाधव,दिपा शिंदे, जयमाला भातलवंडे,मिरा जाधव यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले