August 8, 2025

शेतकरी व कष्टकऱ्यांनी भक्कम एकजूट करावीच लागेल – साथी सुभाष लोमटे

  • संभाजी नगर -१६ फेब्रुवारी २०२४ रोजी शेतकरी कामगारांच्या संयुक्त कृतिसमितिने न्याय हक्कासाठी पुकारलेल्या देशव्यापी संपास , माथाडी कामगारांनी पाठिंबा देवून,जिल्ह्यात ठिकठिकाणी निदर्शने केल्याची माहिती , मराठवाडा लेबर युनियन चे उपाध्यक्ष साथी छगन गवळी यांनी प्रसिद्धीस दिली.
    औरंगाबादेतील कृषि उत्पन्न बाजार, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त कार्यालयावर माथाडी कामगारांनी निदर्शने करून, मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना दिले.
    यावेळी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे,जेष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. एच.एम.देसरडा, बाजार समिती संचालक साथी देविदास किर्तीशाही यांची प्रमुख उपस्थिती होती.
    निवेदनात शेतीमालाचे हमी भावास कायद्याचे संरक्षण, डॉ.स्वामिनाथन आयोगाचे शिफारशींची अंमलबजावणी, माथाडी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी, कायद्यात केली जाणारी मोडतोड तात्काळ थांबवा, शासकीय धान्य गोदामातील माथाडी कामगारांची थकबाकी वसूल करावी, शेतकऱ्यांसह सर्व कष्टकऱ्यांना १० हजाराची पेन्शन, बेरोजगारांना १० हजारांचा बेरोजगार भत्ता इ. मागण्यांचा समावेश आहे.
    मराठवाड्यात एका वर्षात हजार चे वर शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकार त्यांना कर्जातून मुक्त करीत नाही मात्र, उद्योगपतींची लाखों कोटीची कर्ज माफ करते. हा विरोधाभास आहे. सध्याचे सरकारचे शेतकरी व कामगारांकडे अक्ष्यम्य दुर्लक्ष असल्याचे गंगापूर येथील तहसील कार्यालयावर झालेल्या निदर्शनाचे वेळी सांगीतले.
    शेतकऱ्यांना व कामगारांना जगण्याचे प्रश्न सोडवायचे असतील तर, त्यांची भक्कम एकजूट करावी लागेल असे आवाहन साथी सुभाष लोमटे यांनी वैजापूर येथील बाजार समिती येथील सभेत केले.
    जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या व तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली, त्यात बाजार समिती, गोदाम , कांदा मार्केट, वेअर हाऊस, भाजी मार्केट इ. ठिकाणच्या हमाल – मापड्याचा सहभाग होता.
    पैठण येथील आंदोलनाचे नेतृत्व सुबेदार मेजर सुखदेव बन व साथी जगन भोजने यांनी केले , तर सोयगाव, सिल्लोड येथील निदर्शनाचे नेतृत्व साथी छगन गवळी, साथी भगवान वारांगणे , साथी शफीक मामू, साथी खालेद भाई यांनी, कन्नड येथे साथी रामचंद्र काळे, अली खान, व साथी फारुख भाई यांनी केले. गंगापूर, वैजापूर व लासूर स्टेशन येथील आंदोलनाचे नेतृत्व प्रा. एच. एम. देसरडा, साथी देविदास किर्तीशाही,संतोष म्हैसमाले, अशोक पगारे, किरण पगारे, फकीरचंद पवार,साथी लोमटे यांनी केले.
error: Content is protected !!