धाराशिव (जिमाका) – सांस्कृतिक कार्य विभाग-सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत *“शिवगर्जना”* महानाट्याचे आयोजन धाराशिव येथे 18,19 व 20 फेब्रुवारी रोजी श्री.तुळजाभवानी जिल्हा क्रीडा संकुल, धाराशिव येथे सायंकाळी 6.30 ते रात्री 9.30 वाजता दरम्यान केले आहे. 18 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सांवत हे शिवगर्जना महानाट्याचे उद्घाटन करतील. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार सर्वश्री विक्रम काळे, सतिश चव्हाण, सुरेश धस, ज्ञानराज चौगुले, राणा जगजितसिंह पाटील,आ.कैलास पाटील यांची तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनक घोष व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांची उपस्थिती राहणार आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला