February 9, 2026

प्रबळ आत्मविश्वासाने यशाचे शिखर गाठावे – प्रतिक गायकवाड

  • वाशी – येथील कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालयातील इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिक गायकवाड प्रमुख वक्ते म्हणुन उपस्थित होते.तसेच या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवीलेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारीतोषकांचे वितरण करण्यात आले
    अपयश ही यशाचा पहिली पायरी असुन असंख्य संकटांना तोंड देवुन यश प्राप्त करण्यासाठी जीद्दीने व मेहनतीने अभ्यास करायला हवा. विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीनुसार आपले क्षेत्र निवडावे व त्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी करुन नावलौकीक करावा.आपल्या आईवडीलांनी आपल्याप्रती पाहीलेल्या स्वप्नांच्या पुर्तीसाठी कठोर परिश्रम घेण्याची योग्य वेळ म्हणजे विद्यार्थी दशा आहे.अनेक महान व्यक्तींच्या परीश्रमातुन स्वतंत्र भारत आपल्यासमोर आहे आता या भारत देशाला महासत्ताक राष्ट्र बनविण्याची व देशाच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी ही युवा पिढीवर असुन त्यासाठी आत्मविश्वासाने असाध्य ते साध्य करण्याची गरज आहे. असे यावेळी बोलताना ते म्हणाले
    या कार्यक्रमाचे आयोजन कर्मविर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी जि.धाराशिव यांच्या वतीने करण्यात आले होते यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!