August 8, 2025

रुग्ण हीच ईश्वर सेवा – डॉ. आकांक्षा पाटील

  • कळंब – ओम बाल रुग्णालय कळंब येथे मोफत दंत रोग शिबिराच्या अध्यक्षस्थानी इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा आकांक्षा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून लता तीर्थकर व इनरव्हील क्लबच्या प्रोजेक्ट चेअरमन डॉ. संजीवनी जाधवर ,सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.मिनाक्षिताई भवर, श्रीमती निता देवडा,निशा कळंबकर, रेखा तीर्थकर ,ज्योती पवार, डॉ. अश्विनी पवार ,डॉ.मेघा आवटे अथर्व अबॅकस च्या संचालिका राजश्री देशमुख, वैष्णवी दशरथ, डॉ. दिपाली लोंढे, कल्पना जाधवर यांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.मीनाक्षीताई भवर यांनी करताना सांगितले की तेरा वर्षापासून इनरव्हील क्लब वेगवेगळ्या उपक्रम राबवत आहे. त्यामध्ये कॅन्सर शिबिर ,माता_ पालक मार्गदर्शन शिबिर, स्तनपान सप्ताह, नवगत मुलीचे स्वागत , व्यसनमुक्त जीवन असे वेगवेगळे उपक्रम राबवते ,त्यापैकी मोफत दंत रोग तपासणी उपक्रम वर्षातून एक वेळेस डॉ.संजीवनी जाधवर ह्या कुठल्याही फीस न घेता मोफत तपासणी करतात. आपल्या आयुष्यामध्ये शरीर हीच संपत्ती आहे असेही त्यांनी सांगितले.
    डॉ. संजीवनी जाधवर यांनी आपल्या प्रस्तावना करताना सांगितले की सणावाराच्या कामातुन ,थकव्यातून महिला आता बाहेर आलेल्या आहेत. रोजच्या जीवनातील महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये व दातामध्ये कुठल्याही प्रकारचे काडी ,पिन घेऊन दाढ, दात टोकरू नये ,यामुळे दातांना इजा होते. वर्षातून एकदा तरी आपल्या लग्नाच्या वाढदिवसा दिवशी किंवा लहान मुलांच्या वाढदिवसा दिवशी दातांची तपासणी करून आपले जीवन आरोग्य पूर्ण करावे असे आवाहन केले.
    कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉक्टर आकांक्षा पाटील म्हणाल्या की लहान मुली, मुले चॉकलेट खाण्यामुळे दातांच्या समस्या जास्तच वाढत चाललेले आहेत त्यामुळे दातांचा आजार अंगावर काढू नका. आरोग्य हीच संपत्ती आहे आपला अनावश्यक खर्च टाळून आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि वर्षातून एक वेळेस तरी दातांची तपासणी करून घ्या. आमच्या इनरव्हील क्लबच्या सर्व डॉक्टर रुग्ण हीच ईश्वर सेवा समजून रुग्णांची सेवा करत आहेत. यावेळी इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्या व मोफत दंत रोग तपासणी साठी ओम बाल रुग्णालय कळंब येथे लहान मुले, मुली, पुरुष, स्त्रिया मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. मीनाक्षीताई भवर व आभार डॉ. संजीवनी जाधवर यांनी मांडले.
error: Content is protected !!