August 8, 2025

मुस्लिम समुदायाने छत्रपती शिवरायांना अभिवादन करत दिला एकतेचा संदेश

  • कळंब – एकाच दिवशी गणेश विसर्जन आणि पैगंबर जयंती आल्याने सामाजिक बांधिलकी जपत कळंब येथे दुसऱ्या दिवशी म्हणजेच 29 तारखेला जुलूस काढण्यात आला. ढोकी रोड येथील मक्का मस्जिदपासुन जुलूसची सुरुवात झाली. आणि जुलूस जेव्हा छत्रपती शिवाजी चौकात आला तेव्हा मुस्लिम समाजाकडून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी पोलीस निरीक्षक सुरेश साबळे, डिकसळ ग्रामपंचायत सदस्य इम्रान मुल्ला,युवासेना तालुकाप्रमुख ईश्वर शिंदे, मुख्तार मिर्झा,अमन मोमीन,मोहम्मद अली शेख,अभय गायकवाड,निर्भय घुले,गोपाळ चोंदे,फरमान सय्यद,अमर चाऊस आणि अकिब पटेल उपस्थित होते.
error: Content is protected !!