कळंब – कळंब येथील वारकरी संप्रदायातील ह.भ.प.सुरेश महाराज बोराडे ( ७८ ) यांचे तेरणा चारिटेबल ट्रस्ट रुग्णालय नेरूळ मुंबई येथील रुग्णालयात उपचार दरम्यान दिनांक ९ फेब्रुवारी 2024 वार शुक्रवार रोजी सकाळी ११ .०० वाजता दुःखद निधन झाले. ह.भ.प.सुरेश ज्ञानोबा बोराडे महाराज कळंब पंचक्रोशीत प्रवचन ,कीर्तनकार म्हणून परिचित होते.संत ज्ञानेश्वर माऊली उत्तरेश्वर पिंपरी यांचे ते भक्त होते.संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या दर्शनासाठी सवडी प्रमाणे भक्त जात असतात.या सदभक्तांना एकत्रित दर्शनासाठी जाता यावे.यासाठी गेली २८ वर्ष प्रत्येक वर्षी श्री संत साधू बुवा पालखी सोहळा पिंपळगाव (डोळा) व पायी दिंडी सोहळा विठ्ठल मंदिर पुनर्वसन सावरगाव कळंब ते उत्तरेश्वर पिंपरी आयोजन करीत असत.या दिंडीत पिंपळगाव (डोळा) डिकसळ, खडकी ,कळंब येथील साधू बुवा व माऊलीचे भक्त सहभागी होतात बोराडे महाराजांनी पुनर्वसन सावरगांव कळंब येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे निर्माण कार्य केले आहे. त्यांच्या पश्चात २ मुले २ मुली ,नातवंडे,शिष्यगण असा परिवार आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले