कळंब (अरविंद शिंदे ) – गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने घेण्यात येणारी गांधी विचार संस्कार परीक्षा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील इतिहास विभागा तर्फे दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेमध्ये एकूण 66 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यामधील जिल्ह्यात प्रथम वर्षातून पहिला क्रमांक भराटे पांडुरंग या विद्यार्थ्याने ,जिल्ह्यातून तृतीय क्रमांक रूपदास अंकिता या विद्यार्थिनीने पटकविला आहे. दरवर्षीप्रमाणे गांधी विचार संस्कार परीक्षेतील यश संपादन करण्याची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर साहेब,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.यावेळी डॉ.संजय कांबळे,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, डॉ.सतीश लोमटे,डॉ. ज्ञानेश चिंत्ते, डॉ. ईश्वर राठोड, डॉ.पल्लवी उंद्रे ,डॉ. संदीप महाजन, डॉ.विश्वजीत मस्के,प्रा. विलास अडसूळ, प्रा.गोविंद काकडे,प्रा. गोविंद फेरे,प्रा.अमोल शिंदे, डॉ. दीपक वाळके,प्रा. राम दळवी, डॉ. बालाजी वाघमारे, हे उपस्थित होते.या परीक्षेचे पर्यवेक्षक म्हणून प्रा .सुशील जमाले, प्रा.शाहरुख शेख, डॉ. नामानंद साठे यांनी सहकार्य केले. या परीक्षेचे समन्वयक म्हणून इतिहास विभाग प्रमुख लेफ्टनंट डॉ.पावडे के.डब्ल्यू. व डॉ.वर्षा सरवदे यांनी काम पाहिले. ही परीक्षा पार पाडण्यासाठी डॉ. मीनाक्षी जाधव,प्रा.अर्चना मुखेडकर, डॉ.नागनाथ आदाटे,प्रा. मेहराज तांबोळी, प्रा. ज्योती टिपरसे,प्रा.किरण बारकुल,हनुमंत जाधव,संतोष मोरे,अरविंद शिंदे,संदीप सूर्यवंशी, यांनी मोलाचे सहकार्य केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात