पिंपळगाव (लिंगी) – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने वाशी तालुक्यातील पिंपळगाव(लिंगी) येथील संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी NMMS परीक्षा २०२३-२०२४ मध्ये घवघवित यश संपादन केले आहे.
या विद्यालयातील ६ विद्यार्थी घवघवीत गुण मिळवून उत्तीर्ण झाले.त्यांची नावे पुढीलप्रमाणे कु. गाडे प्रज्ञा प्रवीण,कु.सुमैया हाज्जुमियाँ शेख,कु.ऋतुजा आश्रुबा भालेकर,कु.निकिता नितीन गाडे,कु.प्रेम संभाजी जुगदर,कु.सुकृत बाळासाहेब मुसळे.
या सर्व उत्तीर्ण विद्यार्थांचे ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर,संभाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक युवराज सावंत,संस्थेचे सर्व पदाधिकारी,गावकरी यांनी कौतुक केले आहे.
More Stories
शिवशक्ती सहकारी साखर कारखानाच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
वाशी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविले
हनुमंत पाटुळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित