August 9, 2025

राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न

  • उस्मानाबाद (राजेंद्र बारगुले ) – कृषी महाविद्यालय आळणीच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष शिबिर हे दिनांक २५ ते ३१ जानेवारी २०२४ दरम्यान धाराशिव तालुक्यातील हिंगळजवाडी येथे पार पडले. शिबिरा दरम्यान ग्राम स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती, मतदान जनजागृती, रक्तदान शिबिर तसेच कृषी विषयक जसे की कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर, गांडूळ खत निर्मिती आणि फायदे, कुक्कुटपालन विषयक मार्गदर्शन, उत्पादन वाढीसाठी जिवाणू खतांचा वापर आणि कृषी व विदेशी व्यापार इ. विषयांवर मार्गदर्शन पर व्याख्याने आयोजित करण्यात आले होते. या शिबिरांतर्गत गावातील शेतकरी बांधवांना बोर्डो पेस्ट तयार करण्याबाबत प्रात्यक्षिक दाखवण्यात आले तसेच त्याचे फायदे सांगण्यात आले. हे शिबिर आयोजित करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील, व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे यांचे तसेच हिंगळजवाडी गावचे सरपंच मा.श्री. सुरेश नाईकनवरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. शिबिर यशस्वी होण्यासाठी रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. गांधले अमित, प्रा. सुतार रामचंद्र, प्रा. सुतार नंदकिशोर, प्रा. शेटे देवानंद, प्रा. दळवे सतीश, प्रा.भालेकर सुनिल, प्रा. दळवी विशाल, प्रा. माळी प्रवीण, प्रा. कांबळे अक्षय तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी अथक परिश्रम घेतले.
error: Content is protected !!