August 8, 2025

तुटलेल्या संसाराला जोडणारी समाज विकास

  • उमरगा (माधावसिंग राजपूत ) – येथील समाज विकास संस्था तुटणाऱ्या संसाराला जोडण्याचे काम समूपदेशन केंद्राच्या माध्यमातून करते आहे.
    आतापर्यंत जवळजवळ किमान तीन ते चार हजार कुटुंब जोडण्याचं काम धाराशिव, लातूर या जिल्ह्यातून केलेल आहे.
    कौटुंबिक तंटे सोडवणे, समुपदेशन करणे तुटलेल्या संसाराला पुन्हा जोडण्याचं काम नियमित पद्धतीने चालू असते. अत्याचारित मुली, महिला, रात्री आपरात्री जेव्हा पोलीस स्टेशनला येतात; तेव्हा तेथे निवास भोजनाची सोय नसते अशावेळी समाज विकास संस्थांमध्ये काही कालावधीसाठी आसरा दिला जातो.अशी माहिती अनाथाची माय विद्याताई वाघ यांनी दिली.
    सोबत अनाथ मुलांचे घर चालविणे ,सोबत नैसर्गिक मानवनिर्मित आलेल्या आपत्ती निवारण्यासाठी काम करते. दुष्काळ, कोविड, भूकंप अशा महामारीवर मात करण्यासाठी समाज विकास संस्था अग्रेसर असते. कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षित करणे, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे. एकल महिला,शेतकरी महिलांना अर्थसहाच्या माध्यमातून त्यांच्या पायावर उभा करण्यासाठी ग्रामीण भागातील चालू असणारे छोटे छोटे उद्योग यांना चालना देणे , मदत करणे यासाठी कार्य करते.
    *ज्यास कोणी नाही त्यास देव आहे.* या उक्ती प्रमाणे शेवटच्या माणसांना मदतीचा हात देण्याचे कार्य धाराशिव जिल्ह्यातील उमरगा या ठिकाणी चालू आहे. हा सामाजिक प्रपंचाचा डोलारा सध्या भूमिपुत्र वाघ आणि विद्याताई वाघ चालवित आहेत..
error: Content is protected !!