August 8, 2025

छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या रासेयो विभागाकडून स्वच्छता मोहिम संपन्न

  • कळंब- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब व आयक्युएसी/रासेयो विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिक्षणाची ज्योत पेटवु,बालविवाह समूळ मिटवू’ विशेष वार्षिक रासेयो च्या शिबीरामध्ये शनिवार दि. २७/०१/२०२४ रोजी ‘स्वच्छता मोहिमोचे’ आयोजन लोहटा (प.)येथे करण्यात आले होते.सकाळी या मोहिमेची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. यावेळी जि.प.प्रा.शाळा लोहटा(प)येथील परिसर स्वच्छ करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.
    यावेळी प्राचार्य.शशिकांत जाधवर, रासेयो चे कार्यक्रमाधिकारी प्रा.ज्योतिराम जाधव व प्रा.मनिषा कळसकर, प्रा.सुनिता चोंदे,प्रा.शफीक चौधरी,डॉ.अनंत नरवडे, डॉ.महेश पवार प्रा.विनायक मिटकरी,मुरलीधर चोंदे,दत्ता गायकवाड,सुंदर कदम,दतात्रय कांबळे रासेयो प्रतिनिधी गायत्री चोंदे व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी व रासेयो विभागातील स्वयंसेवक या सर्वानी मोलाचे श्रमदान करून कार्यक्रम यशस्वी केले. दुपारी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. ‘पर्यावरण संवर्धन काळाची गरज’या विषयवार डॉ.उद्धव गंभिरे यानी मोलाचे मागदर्शन केले.प्रमुख उपस्थितीत डॉ.संदीप हंडीबाग व डॉ.महावीर गायकवाड होते. सुत्रसंचालन प्रा.ज्योतिराम जाधव यानी व अध्यक्षीय समारोप प्रा.अनिल जगताप यानी केले.आभार प्रा.अभिमान ढाणे यानी मानले.यावेळी रासेयो चे स्वयंसेवक व गावकरी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
error: Content is protected !!