August 8, 2025

विद्यार्थीनीचा प्रजासत्ताक दिन समारंभात अतिथी म्हणून सहभाग

  • धाराशिव – दिल्ली येथील ७५ व्या प्रजासत्ताक दिन समारंभात दि. २६ जाने २०२४ रोजी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरातील जल व भूमी व्यवस्थापन विभागातील विद्यार्थीनी अश्विनी राम ढेरे यांनी निमंत्रित अतिथी म्हणून सहभाग घेतला.आयुष आरोग्य वर्धिनी केंद्र,चिलवडी तालुका धाराशिव येथे त्या कार्यरत आहेत. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडून त्यांना निमंत्रित करण्यात आले होते. संपूर्ण देशातून ठराविक योग प्रशिक्षकांना यासाठी निमंत्रित करण्यात आले होते.या यशाबद्दल विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा.डाॅ.प्रशांत दीक्षित,जल व भूमी व्यवस्थापन विभाग प्रमुख डाॅ. नितीन पाटील,कमवा व शिका योजना समन्वयक डाॅ. गोविंद कोकणे, विद्यार्थी विकास विभाग समन्वयक डाॅ.विक्रम शिंदे, सर्व विभागप्रमुख,प्राध्यापक यांनी त्यांचे अभिनंदन केले.
error: Content is protected !!