August 8, 2025

ईटकुर ग्रामपंचायतला प्रजासत्ताक दिनी संविधान निर्मात्याचा विसर

  • कळंब – तालुक्यातील ईटकुर या गावी २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणात संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा विसर पडला असून
    वारंवार ग्रामस्थांकडून सरपंच, प्रशासकीय कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देऊनही काही फरक पडेना.त्यामुळे कर्तव्यात कसूर करून हेतू परस्पर जाणीवपूर्वक महापुरुषांची अहवेलना करणाऱ्या व कायदा व्यवस्था बिघडणाऱ्या संबंधित ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या विरुद्ध १०६ ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी यांना कारवाईसाठी निवेदन देण्यात आले आहे.
    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,प्रशासन स्तरावरील साजरे होणारे राष्ट्रीय सण, उत्सव ज्या त्या वेळी कार्यक्रमाचे महत्त्व समजून घेऊन कार्यक्रम साजरे करणे संदर्भात ग्रामपंचायतचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी यांना वारंवार ग्रामस्थांनी चर्चा करूनही त्यांच्यामध्ये काहीच बदल दिसून आला नाही.
    दि.२६ जानेवारी १०२४ रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन भारताला संविधान देणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूजेसाठी फोटो अथवा त्यांची प्रतिमा असणे आवश्यक असताना ग्रामपंचायतचे कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे व जातीय द्वेश भावनेतून ईटकुर या गावी डॉ.बाबासाहेबांची संविधान देतानाची प्रतिमा न लावताच
    प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. त्यामुळे ईटकुर येथील ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊन व योग्य न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थ आक्रमक झालेले दिसून आले.
    यावेळी संबंधित कर्मचारी व अधिकारी सरपंच यांच्या विरोधात कळंब तहसीलदार, पोलीस उपविभागीय अधिकारी, पोलीस निरीक्षक कळंब यांना निवेदन देऊन संबंधित कर्तव्यात कसूर करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे लेखी निवेदन १०६ ग्रामस्थांच्या सहिनिशी देण्यात आले. यावर प्रातिनिधीक स्वरूपात हे निवेदनावर दैनिक देशभक्त संपादक लक्ष्मण शिंदे, व्हाँईस ऑफ मीडिया डिजिटल विभाग तालुका अध्यक्ष अमोल रणदिवे,पत्रकार सुधाकर रणदिवे, सामाजिक कार्यकर्ते रितेश लगाडे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे,भाई बजरंग ताटे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
error: Content is protected !!