August 8, 2025

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपीला तात्काळ अटक करा – राष्ट्रीय चर्मकार महासंघ

येरमाळा (कुंदन कांबळे ) – कळंब तालुक्यातील येरमाळा येथे गोविंद नवनाथ पौळ यांचा हॉटेलचा व्यवसाय आहे. गोविंद पौळ हे हॉटेल समर्थकडे जाताना त्यांना स्वतःला, वडील नवनाथ भगवान पौळ व भाऊ बालाजी नवनाथ पौळ यांना आविष्कार ज्ञानेश्वर बारकुल व प्रवीण हनुमंत बारकुल यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. लाथाबुक्क्यांनी व हातातील लोखंडी कड्याने डोक्यावर, तोंडावर जबर मारहाण केली. त्यानंतर दि. 25/01/2024 रोजी ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत येरमाळा पोलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला. त्यातील आरोपी आविष्कार ज्ञानदेव बारकुल यास अटक केली असून अद्यापही प्रविण हनुमंत बारकुल हा आरोपी फरार आहे. तरी या आरोपीस तात्काळ अटक करण्यात यावी. आरोपीला लवकर अटक न झाल्यास राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्यावतीने आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन प्रभारी पोलिस निरीक्षक जाधव यांना राष्ट्रीय चर्मकार महासंघ मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांनी दिले. या निवेदनावर किरण पौळ, सतिश पौळ, दत्ता पौळ, गोविंद पौळ, कुमार पौळ, बालाजी पौळ, निलेश पौळ यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

error: Content is protected !!