August 8, 2025

भारतीय राज्य घटनेमुळेच पददलित व कष्टकऱ्यांना सामाजिक न्यायाचे दरवाजे खुले झाले – अँड.सुभाष सावंगीकर

  • औरंगाबाद – हजारो वर्षापासून गुलामीचे जीवन जगणाऱ्या पददलित, महीला व कष्टकऱ्यांना,स्वातंत्र्यानंतर स्वीकारलेल्या राज्य घटनेमुळे,सामाजिक न्यायाचे दरवाजे खुले झाले असे उदगार मराठवाडा लेबर युनियन चे सरचिटणीस ऍड.सुभाष सावंगीकर यांनी, संविधान भवन येथे झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात काढले. नारळी बाग येथील संविधान भवन येथे, प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजीत कार्यक्रमांत प्रमुख पाहुणे म्हणून ऍड. सावंगीकर बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महारष्ट्र राज्य हमाल मापाडी मंडळाचे सरचिटणीस साथी सुभाष लोमटे हे होते.कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा लेबर युनियन – महारष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ, जय किसान आंदोलन – स्वराज अभियान, कागद कांच पत्रा कामगार संघटना, मोलकरणी व घरेलु कामगार संघटना, शेतकरी शेतमजूर पंचायत इ. संघटनाचे वतीने आयोजीत केला होता. प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रमाची सुरुवात औरंगपुर्यातील क्रांती ज्योती सावित्री बाई व महात्मा फुले यांचे पुतळ्यास अभिवादन करून कऱण्यात आली. यावेळी सत्य धर्माचे आदी घर, सर्व धर्माचे माहेर* या महात्मा फुले यांचे अखंड म्हणून आणि राज्य घटनेच्या प्रास्ताविकेचे वाचन कऱण्यात आले .
  • भारत जोडो, जन गण मन अभियानचे वतीने आज राज्यभर दहा पावले संविधनासाठी हा पदयात्रेच्या उपक्रमाचा भाग म्हणून, औरंगपुरा ते नारळी बाग पदयात्रा काढण्यात आली. संविधान भवन येथील ध्वजारोहन कार्यक्रमास जिल्ह्यातील माथाडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी साथी शेख खुर्रम्म व साथी देविदास किर्तीशाही व साथी छगन गवळी यांची समायोचीत भाषण झाली.
  • * संविधान अबाधित ठेवायचे असल्यास उपेक्षित व कष्टकऱ्यांच्या एकजुटी पर्याय नाही – साथी सुभाष लोमटे…
    समाजातील अपेक्षित, पददलित, कष्टकरी, महीला इ. च्या मुक्तीचा मार्ग खुला होवून जेम तेम ७५ वर्ष होत आहेत. तो मार्ग पुन्हा जात्यांध व धर्मांध मंडळी बंद करू मागत आहेत. त्याचा मुकाबला भक्कम अशा एकजुटीतूनच होवू शकतो. अशी एकजूट दाखवून देशातील शेतकऱ्यांनी १३ महिने दिल्ली आवळून धरली आणि पंतप्रधान मोदींना ३ कृषी कायदे रद्द करायला भाग पाडले, या ताज्या इतिहासापासून एकजुटीचा मंत्र आपण सर्वांनी अंगिकारला पाहिजे असे आवाहन साथी सुभाष लोमटे यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात केले. कार्यक्रमांत साथी प्रविण सरकटे, साथी सर्जेराव जाधव,जगणं भोजने,साथी आत्माराम जाधव, किशोर मगरे,प्रवीण मगरे,राहुल त्रिभुवन,योगेश लांडगे,भागवत साळवे,प्रकाश जाधव,राजू हिवराळे,साथी संतोष म्हैसमाले, साथी प्रभाकर निकाळजे, साथी साईनाथ शिंदे, साथी राजू नवले,रमेश वाघ,लक्ष्मण मेहेर,संदीप सोनावणे,निखिल भोगले,केरबा वाहूल,कल्याण तुपे,दाभाडे,राजू हिरेकर,आठवले इत्यादीचा प्रमुख सहभाग होता.
error: Content is protected !!