August 8, 2025

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी अमर मडके यांची निवड

  • कळंब -तालुक्यातील मोहा येथील अमर राजेंद्र मडके यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कळंब तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या मान्यतेने,सुरेश बिराजदार व सुरेश पाटील यांच्या सूचनेनुसार सामाजिक व राजकिय चळवळीत सक्रिय असणारे तसेच तालुक्यात दांडगा जनसंपर्क असणारे,युवकांच्या व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे मोहा येथील अमर राजेंद्र मडके यांची निवड करण्यात आली.
    राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे,युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे,युवक प्रदेश सरचिटणीस शंतनु खंदारे,जिल्हा कार्याध्यक्ष मनोज जगताप, शमशोद्दीन जमादार व आदी उपस्थित होते.
error: Content is protected !!