August 8, 2025

बोलका बाहुला हसमुखरावने केली मतदार जनजागृती .

  • धाराशिव (जिमाका) – मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षीप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरु आहे. त्‍याअनुषंगाने जिल्‍हाधिकारी डॉ.सचिन ओम्‍बासे यांच्या मार्गदर्शनाखाली स्‍वीप कार्यक्रमाची अधिकाधिक प्रचार प्रसिध्‍दी करण्‍यासाठी निवडणूकविषयक बाबींची फेसबुक, ट्विटर, इंन्स्टाग्राम व युट्युब आदी समाज माध्‍यमांवर लाईक / शेअरचे प्रमाण वाढविण्‍यासाठी व्‍यापक प्रसिध्‍दी देण्‍यासाठी अनुषंगाने उदयसिंह रामराव पाटील या राज्यपुरस्कृत प्राप्त शिक्षकाचा बोलका बाहुला हसमुखराव सोबत मनोरंजनातून प्रबोधन दि. 27 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता येथील श्रीपराव भोसले ज्युनियर कॉलेज येथे बोलक्‍या बाहुल्‍याचा मतदार नोंदणी प्रबोधनपर कार्यक्रम यशस्‍वीरित्‍या संपन्न झाला. या कार्यक्रमात उदयसिंह पाटील यांनी महाविद्यालयीन युवक-युवतींनी तात्‍काळ मतदार नोंदणी करावी तसेच आपल्‍या संपर्कातील सर्वांची मतदार नोंदणी होईल याबाबत मतदार साक्षर होवून मतदार नोंदणी करून घेण्याबाबत आवाहन केले.
    या कार्यक्रमाच्या सुरुवातीस धाराशिवचे तहसिलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी मतदार जनजागृतीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी अप्पर तहसिलदार निलेश काकडे, नायब तहसिलदार जी.एस.स्वामी तसेच श्रीपतराव भोसले ज्युनियर कॉलेजचे प्रशासकीय अधिकारी आदित्य पाटील आणि ज्यांचे वय अठरा वर्ष पूर्ण झाली आहेत अशा विद्यार्थी-विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा.डी.वाय.घोडके यांनी केले
error: Content is protected !!