धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.30 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 233 कारवाया करुन 1,50,500 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
नळदुर्ग पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)रावजी पंढरी खंदारे, वय 65 वर्षे, रा. खुदावाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.30.12.2023 रोजी 13.40 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 1,400 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 1)ऋषीकेश ब्रम्हानंद जाधव, वय 26 रा. देवशिंगा तुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.30.12.2023 रोजी 19.30 वा. सु. आरळी बु. येथील काटकर यांच्या बिअर शॉपच्या बाजूला मोकळ्या जागेत अंदाजे 3,640 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 52 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)सिद्राम रतन बलसुरे, वय 35, वर्षे, आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.30.12.2023 रोजी 13.30 वा. सु. ग्रामपंचायत चौकात शिवशक्ती हॉटेलच्या बाजूस मोकळ्या जागेत अंदाजे 4,290 ₹ किंमतीचे देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या व गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
येरमाळा पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)शारद सिकंबर पवार, वय 32, वर्षे, रा. वाघोली ता. कळंब जि. धाराशिव या दि.30.12.2023 रोजी 17.35 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या बाजूला अंदाजे 55,500 ₹ किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्र 600 लि. व 75 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
ढोकी पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)कांताबाई माणिक पवार, रा. आरणी तांडा ता. जि. धाराशिव, 2) विलास उध्दव पवार, रा. आरणी तांडा ता. जि. धाराशिव हे दोघे दि.30.12.2023 रोजी 17.20 वा. सु. आरणी तांडा येथे अंदाजे 1, 12, 000 ₹ किंमतीचे गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्र 1,300 लि. अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये ढोकी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.30.12.2023 रोजी 14.15 वा. सु. वाशी पो. ठा. हद्दीत अंजनसोंडा येथील चहाचे हॉटेल मध्ये छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)लतीफ अनवर पठाण, वय 54 वर्षे, रा. अंजनसोंडा ता. भुम जि. धाराशिव हे 14.15 वा. सु. अंजनसोंडा येथील आपले चहाचे हॉटेल मध्ये कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 480 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान नळदुर्ग पोलीसांनी दि.30.12.2023 रोजी 12.55 वा. सु. नळदुर्ग पो. ठा. हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)खासीम पापुमियॉ जमादार, वय 72 वर्षे, रा. जळकोट ता. तुळजापूर जि.धाराशिव हे 12.55 वा. सु. जळकोट येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 955₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)दत्ता रतीलाल इंगळे, वय 44 वर्षे, रा. बौध्दनगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. नळदुर्ग ते अक्कलकोट जाणारे रोड लगत असलेल्या उडप्पी हॉटेल च्या बाजूस मोकळ्या जागेत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 990 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.30.12.2023 रोजी 19.45 वा. सु. भुम पो. ठा. हद्दीत पंचायत समिती भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)हरी अर्जुन काळे, वय 30 वर्षे, रा. कल्याणनगर भुम ता. भरुम जि. धाराशिव हे 19.45 वा. सु. पंचायत समिती भुम येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,540 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
नळदुर्ग पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)अजित नारायण दोपारे, वय 30 वर्षे, नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि.धाराशिव,2)सरफराज ईब्राहीम शेख, वय 36 वर्षे, रा. नळदुर्ग ता. तुळजापूर, जि.धाराशिव, हे दोघे दि.30.12.2023 रोजी 17.00 ते 17.20 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एके 0407 व ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एके 0283 हे बसस्थानक नळदुर्ग येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना नळदुर्ग पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भा.द.वि. स. कलम 283 अन्वये नळदुर्ग पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-मोहीनी श्रीधरराव शिरुरे, वय 35 वर्षे, रा. अंबीका नगर लातुर ता. जि. लातुर या धाराशिव बस्थानक येथुन लातुर येथे जाण्यासाठी उभा असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून मोहीनी शिरुरे यांचे गळ्यातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 45,000 ₹ किंमतीचे हे दि. 30.12.2023 रोजी 12.15 वा. सु. चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मोहीनी शिरुरे यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अनुराधा महादेव कोकाटे, वय 40 वर्षे, रा. साळुंकेनगर बेंबळी रोड धाराशिव ता. जि. धाराशिव या धाराशिव बस्थानक येथे लातुर बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून अनुराधा कोकाटे यांचे पर्समधील रोख रक्कम 17,000₹ हे दि. 29.12.2023 रोजी 13.00 वा. सु. चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनुराधा कोकाटे यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सुनंदा पंडीत कदम, वय 50 वर्षे, रा. पिंपळा खुर्द, ता. तुळजापूर जि. धाराशिव या नविन बस्थानक तुळजापूर येथे तुळजापूर ते खडकी बस मध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेवून सुनंदा कदम यांचे गळ्यातील 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 40,000₹ किंमतीचे दि. 15.12.2023 रोजी 16.15 वा. सु. चोरुन नेले. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुनंदा कदम यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-सच्चिदानंद कल्याणराव आवटे, वय 36 वर्षे, रा. वडगाव ता. गेवराई जि. बीड हे त्यांची मिनी बस मध्ये प्रवाशी भरुन अक्कलकोट ते बीड असे जात आसताना दि. 13.12.2023 रोजी 20.00 ते 20.30 वा. सु. तेरखेडा येथील आरुष बिअरबार ते तेरखेडा पासुन अंदाजे 2 किलोमिटर अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपाचे दरम्यान अज्ञात व्यक्तीने मिनी बसच्या टपावर चढून 8 प्रवासी बॅगमध्ये 15 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम 50,000₹ व कपडे असा एकुण अंदाजे 89,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सच्चिदानंद आवटे यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)विलास नाना चव्हाण, 2)सिताबाई छगन शिंदे, 3) रेखा विलास चव्हाण 4)अनिल छाया काळे, 5) बालाजी विलास चव्हाण, 6) सुनिल लाला काळे, 7) अजित दादा शिंदे, 8) छामा काळे, 9) शंकर छमा काळे, 10) अनिल छमा काळे, 11) सुनिल कल्याण शिंदे, 12) देवराव शिंदे, 13) ओम विलास चव्हाण, सर्व रा. ढोकी ता. जि. धाराशिव, 14) रमेश भालचंद्र शिंदे रा. वाखरवाडी ता. जि. धाराशिव व इतर आठ ते दहा इसम यांनी दि.29.12.2023 रोजी 22.00 वा .सु. पेट्रोलपंप ढोकी येथे फिर्यादी नामे-दिपक रविंद्र सुपलकर, वय 20 वर्षे, रा. पेट्रोल पंप चौक ढोकी ता. जि. धाराशिव, यांना नमुद आरोपींनी नांदेड येथील एका मुलास पारध्याची मुले मारहाण करत होती म्हणून फिर्यादी व फिर्यादीचे वडील रविंद्र सुपलकर, भाउ ज्ञानेश्वर राजु सुपलकर, ईश्वर राजु सुपलकर हे भांडण सोडवत असताना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी व त्यांचे वडील यांना जिवे ठार मारण्याचे उद्देशाने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राड, उस, काठी, विटा व दगडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिपक सुपलकर यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 307, 126, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) बाबु राठोड, 2) राहुल राठोड, 3) सचिन राठोड रा. आनंदनगर तांडा ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 13.15 वा. सु. लोहारा खु. येथुन लोकमंगल साखर कारखाना समोरील हॉटेलवर फिर्यादी नामे-रावन देविदास रसाळ, वय 35 वर्षे, रा. लोहारा खु ता. लोहारा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी संगणमत करुन तु आमचे दारुच्या धंद्याची माहिती का देतो या कारणावरुन शिवीगाळ करुन
लाथाबुक्यांनी, कुह्राडीचे दांड्याने, मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रावन रसाळ यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)आनंत उत्तम घुमरे, 2) आत्माराम उत्तम घुमरे, 3) निर्मला आनंत घुमरे, 4) शितल आत्माराम घुमरे, सर्व रा. आंदोरा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 29.12.2023 रोजी 21.00 वा. सु. आंदोरा शिवार येथे फिर्यादी नामे- शहाजी काशिनाथ घुमरे, वय 55 वर्षे रा. आंदोरा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी मागील भांडणाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने, मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी आयोध्या घुमरे या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही शिवीगाळ करुन काठीने मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शहाजी घुमरे यांनी दि.30.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“अनैतिक देह व्यापार करणा-या लॉजवर छापा लॉज मालक चालकावर गुन्हा नोंद .
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1)धनराज हरिश्चंद्र तेलंग, वय 42 वर्षे, व्यावसाय मॅनेजर (शांतादुर्गा लॉज), रा. न्यु बालाजी नगर उमरगा जि. धाराशिव 2) रविंद्र महादेव महतो, वय 35 वर्षे, व्यावसाय वटर (शांतादुर्गा लॉज), रा. कमरवली थाना पिपराही जि. शिवहर राज्य बिहार ह.मु. शांतादुर्गा लॉज ता. उमरगा जि. धाराशिव, 3) आशा रामचंद्र तेलंग (लॉज मालक) रा. उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी संगणमत करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.30.12.2023 रोजी 17.00 वा सु आरोग्य नगरी उमरगा येथील शांतादुर्गा लॉज येथे एक महिलास वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन तीस ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन तिला वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून तिच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले. यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलेची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 370,370(अ)(2),सह अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 अंतर्गत उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल व एकुण 26 वासरांची सुटका.”
गोवंशाच्या कत्तलीवर पुर्णपणे बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशाची तस्करी केली जाते, याला आळा घालण्यासाठी परंडा पोलीसांनी त्यांची गोपनिय यंत्रणा सक्रिय केली होती. दिनांक 30.12.2023 रोजी परंडा पोलीसांना गोवशांची अवैध वाहतुक करणाऱ्यांविरुध्द मोठे यश मिळाले आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे परंडा पोलीसांनी वारदवाडी फाटा परंडा येथे सापळा लावुन एक पिकअप जीप पकडले असता त्यामध्ये एकुण 26 गोवंशीय जातीचे वासरे मिळून आली. सदरील वासरे अत्यंत कोवळी असल्याने त्यांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी पोहचवणे आवश्यक असल्याने जागेवरच पंचनामा करुन आणि पशु वैद्यकिय अधिकारी यांना घटनास्थळावर बोलावून त्यांची वैद्यकीय तपासणी करुन भगवंत बहुउद्देशीय संस्था हाडोंग्री ता. भुम जि. धाराशिव येथे गो शाळेमध्ये सोडण्यात आले आहे. पोलीसांच्या कारवाईने जणु या लहान वासरांना नवीन आयुष्य लाभले आहे. या कारवाईतुन पोलीसांनी अशा प्रकारच्या अवैध धंद्यामध्ये गुंतलेल्या लोकांना इशारा दिलेला आहे. जर कोणी अशा प्रकाराची अवैध कृती करत असले तर त्यांच्याविरुध्द कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल आणि अशा प्रकारच्या अपराधांमध्ये वापरल्या जाणारे वाहने ही जप्त केली जातील आणि त्या वाहनाबाबत संबंधित आरटीओ यांना कळवून कारवाई करण्यात येणार आहे. सदर रेड मध्ये एकुण 7,30,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात पोना/1303 एन. पी. गुंडाळे यांचे फिर्यादीवरुन पोलीस ठाणे परंडा येथे गुरनं 288/2023 कलम मोटार वाहन अधिनियम 1988 चे कलम 192(अ), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11(1)(डी)(ई)(एच), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कलम 5(अ)(1), 9 (बी) महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 6 प्रमाणे गुन्हा नोदंवला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती मुसळे हे करीत आहेत.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक, श्री. अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन, यांच्या मार्गदर्शनाखाली मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग भुम श्री. गौरप्रसाद हिरेमठ, परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री इज्जपवार, सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती कविता मुसळे, पोलीस हवालदार अर्चना भोसले, पोलीस नाईक- नितीन गुंडाळे, पोलीस अंमलदार- योगेश यादव, भुजंग आडसुळ वाहन चालक- सचिन लेकुरवाळे यांचे पथकांनी केली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला