कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने बुधवार दिनांक 10 जानेवारी रोजी पत्रकार पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा सोहळा शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात सकाळी साडेअकरा वाजता होणार असून सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे. कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार वितरण सोहळ्याचे पंचविसावे वर्ष असून यासाठी, लोकशाही न्यूजचे संपादक कमलेश सुतार ,पुढारी न्यूजच्या असिस्टंट न्यूज एडिटर नम्रता वागळे ,राजकीय विश्लेषक अभय देशपांडे, तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक दादा मोहेकर हे उपस्थित राहणार आहेत. या दिवशी पुस्तक प्रकाशन, मोफत आरोग्य तपासणी शिबिर, पुस्तक संकलन मोहीम याच्या शुभारंभाचे ही आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी केले आहे.
*यांचा होणार गौरव…
आफताब शेख (सोलापूर), अतुल कुलकर्णी (बीड), गणेश अण्णा शिंदे (धाराशिव), निलेश मोहिते (बीड), बालाजी अडसूळ (कळंब), गिरीष जव्हेरी (धाराशिव),मुस्तान भाई मिर्झा (कळंब),अब्दुल माजीद काझी ( कळंब) यांचा पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले