कळंब ( महेश फाटक ) – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचलयाने सुचविलेल्या “महापुरुषांचे कौशल्य विकास ” हा कार्यक्रम धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात दि.३० डिसेंबर २०२३ रोजी प्राचार्य सूरज भांडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात प्राचार्य सूरज भांडे व भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्रा.श्रीकांत पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,लोकमान्य टिळक,लोकराजा राजश्री शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती सांगितली. प्रशिक्षणार्थींमधून गिरीधर कवडे,श्रीकांत धाकतोडे यांनी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक अविनाश म्हेत्रे तर सूत्रसंचालन निदेशक विनोद जाधव यांनी केले तर आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी मानले. या कार्यक्रमास प्रा.मोहिनी शिंदे,निदेशिका कोमल मगर,निदेशक सागर पालके,लिपिक आदित्य गायकवाड,विनोद कसबे व सर्व प्रशिक्षणार्थींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले