August 8, 2025

महिला सक्षमीकरणकरिता कौशल्य विकास प्रशिक्षण महत्त्वाचे – संतोष राऊत

  • कळंब (परमेश्वर खडबडे ) – कौशल्य,रोजगार,द्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र शिराढोण चे उद्घाटन ऑनलाइन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सदरील कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. विशेष बाब म्हणून सदरील कोर्सला मान्यता मिळालेली आहे.सदरील प्रशिक्षण कोर्सला हसेगावचे भूमिपुत्र तथा सहाय्यक कौशल्य आयुक्त मंत्रालय मुंबई संतोष राऊत यांनी नुकतीच भेट दिली. याप्रसंगी ते म्हणाले की महिला सक्षमीकरणासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. सदरील प्रशिक्षण मोफत आयोजित करण्यात आलेले आहे. सदरील प्रशिक्षणात डॉक्युमेंटेशन एक्झिक्युटिव्ह हा संगणक कोर्स घेण्यात आलेला आहे. सदरील प्रशिक्षण कोर्स तीन वर्ष घेण्यात येणार आहे. तीनशे विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रशिक्षित करण्यात येणार आहे. यावेळी पोलीस उपनिरीक्षक नेहरकर साहेब यांची उपस्थिती होती. शिराढोण ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती लक्ष्मीताई म्हेत्रे,नामदेव माकोडे रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष,सुरेश महाजन,राजेंद्र गुरव,पवन म्हेत्रे,तसेच ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन अंबाजोगाई चे अध्यक्ष ज्योतीराम सोनके, नवनाथजी खोडसे,ग्रामपंचायत कानडी माळी चे सरपंच अशोक राऊत, बोरगाव ग्रामपंचायत चे सरपंच गव्हाणे,अंकुश राऊत, बिबीशन राऊत,केंद्राचे संचालक ऋषिकेश गुळमे, सचिन कोंडेकर आदींसह प्रशिक्षणार्थी व गावकरी उपस्थित होते. जिल्ह्यातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी अभ्यासक्रम सुरू व्हावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत,भाजपा नेते आमदार राणा जगजीतसिंह पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. सरोजिनी राऊत त्यांनी विशेष मेहनत घेतली. याबद्दल त्यांचे शिराढोन वाशीयांनी खूप खूप धन्यवाद व्यक्त केले आहेत. कळंब तालुक्यातील एकमेव ग्रामीण विकास केंद्र तालुक्यात स्थापन करण्यात आलेले आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार व स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी आणखीन विविध कौशल्याभिमुख कोर्सलाही मान्यता मिळणार आहे. या प्रशिक्षणामुळे कळंब तालुक्यातील युवक व युवतींना याचा फायदा होणार आहे.सदरील कार्यक्रमाचे किरण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
error: Content is protected !!