कळंब पोलीस ठाणे : मयत नामे- आण्णासाहेब केरबा काळे, रा. डोळा पिंपळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी 18.12.2023 रोजी 06.18 वा. सु. डिकसळ ते पिंपळगाव रोडवर फॉरेस्टच्या गायरानजवळ विठ्ठल रघुनाथ बारगुले यांचे शेताचे कडेला लिंबाचे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे-गोविंद बाबुराव शिंदे, रा. संभाजीनगर डिकसळ ता. कळंब जि. धाराशिव याचे कडून घेतलेल्या व्याजाचे पैसे देण्याचे कारणावरुन नमुद आरोपीने मयत नामे आण्णासाहेब काळे यांना व्याजाचे पैशावरुन वेळोवेळी मानसिक त्रास देवून व्याजाचे पैशावरुन मयताची पत्नी व मुलगी यांना घेवून जाईन अशी शिवीगाळ करुन धमकी दिल्यावरुन त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून नैराश्यातुन आण्णासाहेब काळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- आकाश आण्णासाहेब काळे, वय 22 वर्षे, रा. डोळा पिंपळगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.दं.वि. सं. कलम- 306, 504, 506 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.28 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 160 कारवाया करुन 1,11,100 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)व्यंकट चक्रपाणी तेलंग, वय 35 वर्षे, रा. कोळसुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 17.30 वा. सु. आपल्या राहात्या घराच्या समोर अंदाजे 2,600 ₹ किंमतीची 25 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. 1)लोकेश चंद्रशेखर बलसुरकर, वय 39 रा. महादेव गल्ली उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 17.20 वा. सु. ऐश्वर्या बारचे पाठीमागे उमरगा येथे अंदाजे 1,800 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत. धाराशिव ग्रामीण पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)छगन सोमा पवार, वय 48, वर्षे, 2)भारतबाई राजाभाउ पवार, वय 50 वर्षे, दोघे रा. वरुडा पारधी पिडी ता. जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 08.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 88,200 ₹ किंमतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे. वाशी पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)भाग्यश्री नवनाथ शिंदे, वय 45, वर्षे, 2)चिरकाड वस्ती पारा ता. वाशी, जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 15.00 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 12,080 ₹ किंमतीचे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 16 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे -1)शिवशंकर सिदरामअप्पा व्हर्टे, वय 50, वर्षे, आष्टा कासार, ता. लोहारा, जि. धाराशिव हे दि.28.12.2023 रोजी 18.40 वा. सु. चरण कमल हॉटेल बाजूस जेवळी येथे अंदाजे 3,340 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 48 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे
“ जुगार विरोधी कारवाई.”
बेंबळी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलीसांनी दि.28.12.2023 रोजी 14.30 वा. सु. बेंबळी पो. ठा. हद्दीत गणपती जाधव यांचे शेतात बोरीचे झाडाखाली चिखली येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)रमन नवनाथ ढवळे, वय 39 वर्षे, 2) रणजित काका पवार, वय 23 वर्षे, 3) बजरंग बबरु पवार, वय 38 वर्षे, 4) सुभाष बब्रुवान काळे, वय 30 वर्षे, 5) गणेश लक्ष्मण बनसोडे, वय 22 वर्षे, सर्व रा. खिली ता. जि.धाराशिव हे 14.30 वा. सु. गणपती जाधव यांचे शेतात बोरीचे झाडाखाली चिखली येथे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह दोन मोबाईल फोन असा एकुण 16,100 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.28.12.2023 रोजी 15.30 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत गुंजोटी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सुरेश अबु राठोड, वय 24 वर्षे, रा. पळसगाव ता. उमरगा जि.धाराशिव हे 15.30 वा. सु. गुंजोटी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,430 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) यशवंत धोंडीबा बनसोडे, वय 51वर्षे, रा. जुनी पेठ, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, हे दि.28.12.2023 रोजी 20.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 24 एए 1277 ही आरोग्य कार्नर येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे. वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) अमोल विठ्ठल गवळी, वय 35वर्षे, रा. सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव, हे दि.28.12.2023 रोजी 19.00 वा. सु. आपल्या ताब्यातील स्कुटी क्र एमएच 25 एटी 3514 ही सरमकुंडी फाटा ते मुख्य चौकात मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ शासकिय कामात अडथळा करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे- 1) शिवप्रसाद दत्तात्रय दासिमे, रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.12.2023 रोजी 11.30 वा. सु. फिर्यादी नामे-बाळासाहेब अनिल गायकवाड, वय 47 वर्षे, व्यवसाय- शिक्षक रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव हे लोकमान्य टिळक विद्यालय कदेर येथे शासकीय कामकाज करत असताना नमुद आरोपी हा आला व तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना खिचडी चांगली देत नाही असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळासाहेब गायकवाड यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 353, 333, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे
“ मारहाण.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)ज्ञानेश्वर संजय मिस्कीन, 2) संतोष संजय मिस्कीन 3) समाधान हनुमंत मिस्कीन, 4) कृष्णा हनुमंत मिस्कीन, 5) रोहीत नाना रेवडकर सर्व रा. डोमगाव ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.27.12.2023 रोजी 23.00 वा .सु. मेघराज पेट्रोलपंप करमाळा रोड परंडा येथे फिर्यादी नामे-राहुल अशोक चौतमहाल, वय 30 वर्षे, रा. रेवणी भिमनगर परंडा ता. परंडा जि. धाराशिव, यांना व पेट्रोलपंप मालक हनुमंत पाटील यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून पेट्रोलचे पैसे मागण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- राहुल चौतमहाल यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-1)पोपट बलभिम ठवरे, रा. दाउतपुर ता. जि. धाराशिव यांनी दि. 23.12.2023 रोजी 21.30 वा. सु. चिखली शेत शिवार औटेच्य शेतात चिखली चौरस्ता येथे फिर्यादी नामे- बलभिम जगन्नाथ जाधव, वय 41 वर्षे, रा. दारफळ ता. जि. धाराशिव यांनी नमुद आरोपीस हात उसने दिलेले 70,000 ₹ मागीतल्याचा राग मनात धरुन नमुद अरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बियरच्या बाटलीच्या काचेने छातीवर मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बलभिम जाधव यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 326, 323, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)रणजीत मधुकर रणखांब, 2) अजीम गुलाब सय्यद दोघे रा.कुमाळवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.27.12.2023 रोजी 19.30 ते 20.00 वा. सु. कुमाहवाडी येथे फिर्यादी नामे- विश्वनाथ रामभाउ कांबळे, वय 34 वर्षे, रा. कुमाळवाडी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी दुधाची गाडी का आडवली या काणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बेल्टने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी व सुकेशनी कांबळे व भाउ मनीष कांबळे यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व मनिष याचे मनगटावर बेल्टने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- विश्वनाथ कांबळे यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. सह 3(1)(आर)(एस),3(2)(व्हि)(ए) अ.जा.ज.अ.प्र कायदा अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)कमलाकर लिंबराज जाधवर, रा. ताडगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.27.12.2023 रोजी 20.15 वा. सु. ताडगाव येथे फिर्यादी नामे- लिंबराज कोंडीबा जाधवर, वय 60 वर्षे, रा. ताडगाव, ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने मला विचारुन का वहिनीला आणण्यासाठी धाराशिवला गेले नाही या कारणावरुन नमुद आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करुन गाडीवरुन खाली ओढून कमरेच्या बेल्टने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- लिंबराज जाधवर यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506, भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-संभाजी बळीराम जाधव व सोबत मयत नामे- आकाश कालीदास पाटील, वय 25 वर्षे, दोघे रा. तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव हे दोघे दि.26.12.2023 रोजी 17.45 वा. सु. टोलनाका जवळ तलमोड येथुन कार क्र एमएच 25 एएस 5409 मधून जात होते. दरम्यान आरोपी संभाजी जाधव यांनी त्यांचे ताब्यातील कार ही भरधाव वेगात, हायगई व निष्काळजीपणे चालवून रोडचे बाजूला कटड्याला धडकुन स्वता किरकोळ जखमी झाला. व आकाश पाटील यास गंभीर जखमी करुन त्याचे मरणास कारणीभुत झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अर्जुन मुर्लीधर सरवडे/साळुंके, वय 33 वर्षे, रा. तलमोड, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.28.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 184, मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला