August 8, 2025

प्राचार्य जयचंद कुपकर यांच्या सेवापूर्ती समारंभाचे आयोजन

  • कळंब – रणसम्राट क्रीडा मंडळ संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य जयचंद कुपकर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त दि.३० डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता विद्यालयाच्या प्रांगणात रणसम्राट क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्रीमती मनोरमा भवर यांच्या अध्यक्षतेखाली सेवापूर्ती समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
    या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे,मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेचे जिल्हाध्यक्ष डी. के.कुलकर्णी, रणसम्राट क्रिडा मंडळाचे सचिव अँड.सी.एन.भवर,उपाध्यक्ष डॉ.पी.एन.भवर,कार्यवाहक प्रा.श्रीधर भवर हे राहणार आहेत.
    या कार्यक्रमास शहरातील सर्व शिक्षण प्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन उपप्राचार्या प्रा.डॉ.मिनाक्षी शिंदे,उपमुख्याध्यापक जाफर पठाण यांनी केले आहे.
error: Content is protected !!