कळंब – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संलग्नित व शिवसेवा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट कळंब संचलित छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २८ व २९ डिसेंबर २०२३ रोजी महाविद्यालयीन झोनल क्रिकेट स्पर्धेचे तालुका क्रीडा संकुलन ता.कळंब जि.धाराशिव येथे भरविण्यात आले होते.या स्पर्धेंचे बक्षिस वितरण समारंभ दि.२९ डिसेंबर २०२३ रोजी दु.०३.०० वा.तालुका क्रिडा संकुल कळंब येथे संपन्न झाला. आजच्या अंतिम लढत शि.म.रा.गे.शिंदे महाविद्यालय परंडा व व्यंकटेश महाजन महाविद्यालय धाराशिव यांच्यात झाली.या मध्ये शि.म.रा.गे.शिंदे महाविद्यालयने व्यंकटेश महाजन या महाविद्यालयच्या संघाला पराभूत करून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.विजयी संघाना संस्थेचे सहसचिव संजयजी घुले,कोषाध्यक्ष बाळकृष्ण गुरसाळे यांच्या हस्ते प्रथम व द्वितीय विजयी संघास ट्राफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत डॉ.सुधीर बावीकर,प्राचार्य साजिद चाऊस,प्राचार्य.शशिकांत जाधवर,प्रा.शिवकुमार खबाले,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक प्रा.अरविंद शिंदे, प्रा.दादाराव गुंडरे, युनिक अकॅडेमी कळंबचे अज्जू खान सर व वेदपाठक सर इ.मान्यवर उपस्थितीत होते.वरील सर्व मान्यवरांचा सत्कार शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.यावेळी प्रा.संजय घुले यानी विजयी संघाचे आभिनंदन केले व पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन डॉ.हनुमंत माने यानी केले.आभार प्राचार्य शशिकांत जाधवर यानी मानले.सामने पाहण्यासाठी शहरातील प्रेक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व युनिक अकॅडेमी कळंब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले