कन्हेरवाडी – येथील देवी सटवाई मल्टिपल अर्बननिधी लिमिटेड कळंब शाखा कन्हेरवाडी येथे दिनदर्शिका- २०२५ चे प्रकाशन शाखेचे चेअरमन बालाजी अशोक कवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सचिव दीपक हनुमंत जाधव, व्हॉइस चेअरमन अश्रुबा अंकुश कुंभार, सदस्य राम दशरथ कुंभार,पत्रकार महेश मिटकरी, विलास कवडे ,किशोर कवडे ,दयानंद मिटकरी ,रामराजे शिंदे ,धनंजय धोंगडे ,अजित कवडे, ज्ञानेश्वर कवडे ,गणेश कवडे ,श्रीकांत मिटकरी , रवी जाधव ग्रामपंचायत सदस्य बालाजी सूर्यवंशी श्रीराम कवडे मोठ्या संख्येने युवक उपस्थित होते. देवी सटवाई मल्टिपल अर्बन निधी या शाखेने ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक मदत व्यवसायिकदार, महिला बचत गट अशा विविध क्षेत्रातील लोकांना आर्थिक पाठबळ देऊन लहान थोर उद्योगाला पाठबळ देण्याचे काम केलेले आहे.या दिनदर्शिका प्रकाशनानिमित्ताने चेअरमन यांनी प्रत्येक घरोघरी दिनदर्शिका वाटप करून शाखेचे काम वाढवण्याचे सहकार्य करण्यात आलेले आहे.त्यामुळे गावातील ग्राहकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण तयार झालेले आहेत. गावातील शेतकरी मजूर मध्यमवर्गीय लोकांना छोटा मोठा आर्थिक व्यवहार करण्यासाठी या शाखेचा मोठा हातभार लागत आहे या शाखेच्या युवकांनी मोलाचे काम केल्यामुळे गावातील सर्व महिला पुरुष मंडळीकडून त्यांचा गौरव केला जात आहे.शाखेने कमी कालावधीमध्ये चांगले कार्य करून दाखवल्यामुळे गावातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहे.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले