कळंब (जयनारायण दरक)- कळंब तालुक्यातील तलाठी सज्जा मंगरूळ येथे शासन निर्णयानुसार तहसिलदार मुस्ताफा खोंदे यांच्या मार्गदर्शनानुसार महसूल सेवा सप्ताह आयोजित करण्यात आला.या सप्ताहात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना तांत्रिक अडचणी मुळे प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ दिला गेला,गावातील प्रलंबित फेरफार नोंदी निकाली काढल्या,अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या अनुदान यादी शासनाच्या पोर्टलवर अपलोड केल्या, गावातील अपंग लाभार्थ्यांना जनधन योजना अंतर्गत खाते उघडून देण्यात आले तसेच त्यांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा लाभ देण्यात आला,लाभार्थ्यांना शिधापत्रिका देण्यात आल्या,तसेच शेतकरी बांधवांना शासनाच्या इतर योजनाची माहिती देण्यात आली. या सप्ताह मध्ये तलाठी डि.व्ही.सिरसेवाड पाटील यांनी चांगले काम केल्याबद्दल सप्ताहाची सांगता शेवटी सर्व गावकऱ्यांनी मिळून लोकसभागातून व श्रमदानातून तलाठी कार्यालयाची स्वच्छता व रस्ता करून दिला. यावेळी गावकऱ्यांनी तलाठी व महसूल प्रशासनाचे आभार मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले