धाराशिव – येथील मानव अधिकार व सामाजिक न्याय शिष्ठ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शहरात एक बेवारस वृद्ध महिला आढळून आली होती.त्या महिलेला आनंदनगर पोलिस स्टेशनच्या मदतीने महिला आधार गृहामध्ये पाठवण्यात आले होते. तिथून त्या महिलेला मानसिक आजार असल्या मुळे शासकीय हॉस्पिटल मध्ये ५ दिवस उपचार करून अखेर त्या महिलेला मुख्य न्याय दंडाधिकारी उस्मानाबाद यांच्या समोर हजर करून येरवडा येथील मेंटल हॉस्पिटल येथे संदर्भित करण्यात आले.या सर्व प्रक्रियेमध्ये आनंद नगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक बांगर व त्यांच्या टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.त्या निमित्त मानव अधिकार व सामाजिक न्याय शीष्ठ मंडळाच्या वतीने पुष्प गुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.सदर प्रसंगी मानव अधिकार च्या जिल्हा अध्यक्ष ॲड.जिनत प्रधान, मुख्य समन्वयक बाबासाहेब जानराव,कायदे विषयक सल्लागार ॲड.निलेश प्रधान व मुख्य निरीक्षक रघुनाथ गायकवाड सह पोलीस अधिकारी व कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला