कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात गांधी जयंती निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समिती कळंब व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय इतिहास विभाग यांच्या वतीने दि.२६ सप्टेंबर २०२३ रोजी संकेत मुनोत,पुणे यांचे ‘मोहब्बत का नाम’ गांधी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळेस बोलताना संकेत म्हणून म्हणाले की, ‘भारताला जर अखंड ठेवायचे असेल तर महात्मा गांधींच्या विचारांची गरज आहे. भारताने स्वातंत्र्योत्तर जी वाटचाल केलेली आहे. जी प्रगती साधली आहे त्याचे सर्व श्रेय महात्मा गांधींच्या विचाराला जात’असे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील पवार, लाभले,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.वर्षा जाधव यांनी केले तर आभार प्रा. धावारे यांनी मानले.विशेष उपस्थितीमध्ये डॉ.हेमंत भगवान,प्रा.प्राजक्ता पाटील,डॉ.दादाराव घुंडरे, डॉ.दीपक सूर्यवंशी, डॉ. मीनाक्षी जाधव, डॉ.संजय सावंत,प्रा.अर्चना मुखेडकर,डॉ. के.डब्ल्यू.पावडे,प्रा. गोविंद फेरे, प्रा.राम दळवी,अनिस उस्मानाबाद जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद शिंदे,संदीप सूर्यवंशी यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले