April 6, 2026

अमन शेख यांच्या वाढदिवसानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

  • कळंब – कळंब शहरातील एहसास फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवले जात असून,संस्थापक अध्यक्ष अमन भाई शेख यांच्या वाढदिवसानिमित्त (दि. ५ एप्रिल) संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय,कळंब येथे विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
    वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळत फाउंडेशनच्या सदस्यांनी एकत्र येऊन मूकबधिर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच खाऊ वाटप केले.या उपक्रमामागील उद्देश विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे व त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणे हा होता.
    या कार्यक्रमास ह.भ.प. महादेव महाराज अडसुळ यांची प्रमुख उपस्थिती लाभली.तसेच ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, पत्रकार शिवाजी सावंत यांच्यासह फाउंडेशनचे अध्यक्ष वाजेद तांबोळी,तौफीक अली सय्यद, अरफात शेख,महम्मद शेख,
    आदिल अली सय्यद,आरेफ शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
    कार्यक्रमात फाउंडेशनच्या सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा उपक्रमाच्या यशाची साक्ष देणारा ठरला.
    भविष्यातही असेच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प यावेळी एहसास फाउंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
error: Content is protected !!