कळंब – तालुक्यातील दुधाळवाडी येथे आर.एस.पोल्ट्री फार्म अँड अँग्रो बिझनेसच्या वतीने पंचायत समिती कळंबचे सदस्य नामदेव जाधव व सदस्यपती हरी राऊत यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रोप्रायटर सुभाष लाटे यांनी मान्यवरांचे स्वागत करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमात स्थानिक विकासाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.विशेषतः दुधाळवाडी परिसरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था लक्षात घेता,या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी उपस्थित करण्यात आली.यावर पंचायत समितीच्या माध्यमातून आवश्यक ती कार्यवाही करून रस्ते सुधारणा लवकरात लवकर करण्यात येईल,असे आश्वासन सदस्य नामदेव जाधव व सदस्यपती हरी राऊत यांनी दिले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिलीप जाधव,अमोल चौधरी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण असून,ग्रामविकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
More Stories
परमभक्तीनेच भगवंत प्राप्त – ह.भ.प.संदीपान महाराज हसेगांवकर
‘जय हनुमान तालीम संघा’चा सामाजिक उपक्रम;हनुमान जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
“महिलांच्या नेतृत्वात साजरी होणार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती”;कळंब आगारात जयंती समितीची घोषणा