August 8, 2025

जिल्हास्तरीय संवाद कार्यशाळेत महिला सक्षमीकरण विषयी मार्गदर्शन

  • कळंब-स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने क्रीडा संकुल सभागृह कळंब येथे जिल्हास्तरीय संवाद कार्यशाळा घेण्यात आली या कार्यशाळेत कळंब,वाशी,भूम , तालुक्यातील महिलांची मोठी उपस्थिती होती. कार्यशाळेत शासनस्तरावरील कृषी विभागाच्या विविध योजना त्यामध्ये महा डी बी टी ऑनलाइन योजना , नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना रोजगार हमी योजना , लघु उद्योग , शेतीविषयक पूरक व्यवसाय आदी योजनेची माहिती देण्यात आली . याच बरोबर महिला सक्षमीकरण, नेतृत्व विकास ग्रामीण भागातील महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी गृह उद्योग तसेच गटाच्या माध्यमातून मोठे उद्योग यासाठी शासनाकडून मिळणारे अनुदान ,उत्पादन व विक्रीसाठी बाजारपेठ याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले व कार्यशाळेच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांत याविषयी जागृती होईल व महिलांचा सहभाग वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.स्वयंशिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून महिलासाठी शिक्षण मार्गदर्शन व मदत केली जात आहे याचे कौतुक केले. संवाद कार्यशाळेत काकासाहेब अडसुळे,धनंजय पवार,कृषी विभागाचे नंदकिशोर कदम,वैभव तांबारे,खादी ग्रामोद्योगाचे सचिव सुनील गायकवाड ,ज्येष्ठ पत्रकार माधवसिंग राजपूत, सचिन क्षिरसागर , दिलशाद तांबोळी, विजयमला शेंडगे यांनी मार्गदर्शन केले व व महिलाशी संवाद केला कार्यशाळेचे सूत्रसंचालन देवकन्या जगदाळे यांनी तर आभार दिलशाद तांबोळी यांनी मानले.
  • हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्योती वाघ ,जनाबाई गिरी ,राजश्री गपाट ,रेश्मा आहेर, सीता भोरे,विजयमाला शेंडगे ,अश्विनी लोखंडे ,अश्विनी मस्के, नेहा खुणे ,सारिका जाधव, उर्मिला तवले यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!