मोहा – ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे दि.९ एप्रिल २०२६ रोजी संस्थापक अध्यक्ष,शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक सतीश कानगुडे, सहशिक्षक कमलाकर शेवाळे,डी. बी.मडके,संजय आडने,मंगलदास पवार,जनार्दन भामरे,सूर्यकांत गुंगे,सतीश मडके, शैलेश गुरव,राजाभाऊ चिलवंत तसेच प्रा.राहुल भिसे,प्रा. दिग्विजय पाटील,प्रा.विठ्ठल जाधव,प्रा.अमित जाधव,प्रा.रोहित मोहेकर,उषा पांचाळ,प्रा.प्रतिभा सावंत, अमितकुमार शर्मा,बी.एम.काळे, अनूप पाटील,धनंजय परजणे, अंगद आगलावे,ज्ञानोबा टोपे, प्रथमेश साडेकर यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी शिक्षणमहर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाचे स्मरण केले.त्यांच्या विचारांवर चालत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून प्रगती साधावी आणि समाजाच्या उन्नतीसाठी कार्य करावे,अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
More Stories
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार